'दरारा काय असतो...'; भाजपाच्या होर्डिंग्जची औरंगाबाद शहरात जोरदार चर्चा

सध्या पाण्यावरून भाजप आणि शिवसेनेत जोरदार शाब्दिक वॉर सुरू आहे. त्यात आता भाजपने लावलेल्या एका दराऱ्याच्या होर्डिंग्जची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.
BJP Hoardings
BJP Hoardingsमाधव सावरगावे

माधव सावरगावे

औरंगाबाद: सध्या पाण्यावरून भाजप आणि शिवसेनेत जोरदार शाब्दिक वॉर सुरू आहे. त्यात आता भाजपने लावलेल्या एका दराऱ्याच्या होर्डिंग्जची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे. दरारा काय असतो हे दाखवून दिलंय, असं भाजप (BJP) आणि शिवसेनेचे (Shivsena) नेते एकमेकांना सांगतायत.

BJP Hoardings
Cannes Film Festivalमध्ये ऐश्वर्या राय बच्चनची जादू; पेस्टल कलरच्या गाऊनमध्ये एलिगंट लूक

23 मे रोजी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादमध्ये (Aurangabad) पाणी प्रश्नावरून मोर्चा निघणार आहे. या मोर्चासाठी भाजपकडून रस्त्यावर बॅनर, होल्डिंग आणि सोशल मीडियावर पोस्टर, व्हिडीओज अपलोड केले जातायत. त्यात शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या कार्यालयासमोर क्रांती चौकात भाजपने एक होर्डिंग लावले, त्या होल्डिंगमध्ये 'दरारा असा असतो; साहेब येणार म्हणल्यानंतर पाणीपट्टी 50 टक्क्यांवर' असा मजकूर लिहिण्यात आला होता.

हे देखी पाहा-

मात्र, काही तासातच तिथून होर्डिंगस काढण्यात आले. त्यावर शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी दरारा कोणाचा कसा असतो, हे कळलं, असा भाजपला टोला लगावला. तर इथं केवळ शिवसेनेचा दरारा असतो अशी प्रतिक्रिया मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com