Goa: भाजप विरोधी गट फोडण्यात यशस्वी; लोबोंना टक्कर देण्यासाठी कंबर कसली

माजी मंत्री मायकल लोबो यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केल्याने त्यांच्या विरोधात कुणाला उभा करावे हा भाजपसमोर पेच निर्माण झाला होता.
Goa: भाजप विरोधी गट फोडण्यात यशस्वी; लोबोंना टक्कर देण्यासाठी कंबर कसली
Goa: भाजप विरोधी गट फोडण्यात यशस्वी; लोबोंना टक्कर देण्यासाठी कंबर कसलीSaam TV
Published On

पणजी: उत्तर गोव्यातील कळंगुट मतदार संघातील भाजप विरोधातील गट फोडण्यात भाजप यशस्वी झाला असून माजी मंत्री मायकल लोबो यांना टक्कर देण्यासाठी कलंगुटचे माजी सरपंच जोसेफ सिक्वेरा यांना भाजपात (BJP) घेण्यात आले असून त्यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. आज पणजीतील (Panjim) भाजपच्या प्रचार कार्यालयात जोसेफ सिक्वेरा यांचा भाजपात प्रवेश देण्यात आला यावेळी पक्षाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह अनेक आमदार उपस्थित होते.

माजी मंत्री मायकल लोबो यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केल्याने त्यांच्या विरोधात कुणाला उभा करावे हा भाजपसमोर पेच निर्माण झाला होता. यापूर्वी भाजपने पक्षाबाहेर असलेले मात्र पक्षाला मानणाऱ्या गुरुदास शिरोडकर यांना पक्षात सामावून घेऊन मायकल यांच्या विरोधात उभा करण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र आता मायकल यांच्या विरोधात उभा करण्यासाठी त्यांच्या ताकतीचा उमेदवार असावा यासाठी नव्यानेच तृणमूल काँग्रेस मध्ये गेलेल्या जोसेफ सिक्वेरा यांना फोडण्यात भाजप यशस्वी झाली आहे त्याना कलंगुट मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार असल्याचेही पक्षाध्यक्ष तानावडे यांनी जाहीर केले.

Goa: भाजप विरोधी गट फोडण्यात यशस्वी; लोबोंना टक्कर देण्यासाठी कंबर कसली
महाराष्ट्रातील सरकार अक्कलशुन्य; फडणवीस सरकारवर बरसले

यापूर्वी सिक्वेरा काँग्रेसमध्ये होते. सिक्वेरा, माजी आमदार आग्नेल फर्नांडिस आणि आथेनी मॅनेझीस यांचा भाजप विरोधी गट कार्यरत होता. या तिघांना ही काँग्रेसची उमेदवारी मिळाली नसल्याने काही दिवसांपूर्वी त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. अखेर यातील जोसेफ यांना फोडण्यात भाजप यशस्वी झाले असून आता भाजपतर्फे जोसेफ सिक्वेरा हे मायकल लोबो यांच्या विरोधात निवडणूक लढवतील. सध्या कॉंग्रेसमध्ये गेलेले हे संधिसाधू असून त्यांना जनता कधीही माफ करणार नाही. त्यांची मानसिक स्थिती बिघडलेली आहे. यापुढे आपण एकत्र काम करूया मला भाजपात घेतल्याबद्दल सर्वांचे जाहीर आभार असे मत जोसेफ सिक्वेरा यांनी व्यक्त केले.

भाजपने गेल्या दहा वर्षात राज्याचा सर्वांगीण विकास केला असून डबल इंजीन सरकारने सर्व जनतेचा विकास करण्याची प्रक्रिया चालू ठेवलेली आहे. या पुढच्या काळात ही प्रक्रिया अशीच चालु राहील. येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये 22 प्लस उमेदवार निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे. जोसेफ सिक्वेरा भाजपात आल्याने भाजपची सीट निश्चित झाले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com