Civic Body Polls : महापालिका निवडणुकीसाठी भाजपने रणशिंग फुंकलं, नड्डा-शाह मैदानात

Civic Body Elections : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठ भाजपकडून जोरदार तयारी सुरू करण्यात येत आहे. रविवारी निवडणुकीची घोषणा करण्यात येणार आहे.
देवेंद्र फडणवीस
BJPSaam tv
Published On

BJP Prepared upcoming Mahapalika election : राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी भाजप फुंकणार रणशिंग आहे. भाजपच्या महाविजय ३.० अभियानास उद्यापासून (रविवार, १२ ऑगस्ट) सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भाजपचे सर्व जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत.

अधिवेशन कसं असेल, कोण कोण संबोधित करणार?

दुसऱ्या बैठकीत फडणवीस हे भाजपच्या सर्व आमदार व मंत्र्यांसोबत संवाद साधतील. रविवारी दिवसभर भाजप नेत्यांचे विचार मंथन होईल. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उद्या अधिवेशनाच्या पहिल्या सत्राची सुरुवात करतील.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे निवडणुकीसाठी सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील. पहिल्या सत्राचा समारोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या भाषणाने होईल. दुसऱ्या सत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यकर्त्यांना कानमंत्र देतील. अधिवेशनाचा समारोप हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भाषणाने होईल.

देवेंद्र फडणवीस
Maharashtra Politics : मविआमध्ये फूट, ठाकरेंचा स्वबळाचा नारा, मुंबईपासून नागपूरपर्यंत एकला चलो रे

काय असेल या अधिवेशनात?

विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल महाराष्ट्रातील जनतेच्या अभिनंदनाचा प्रस्ताव पारित केला जाईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक संदर्भात महाविजय ३.०ची घोषणा केली जाईल. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी रणनिती आखली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अभिनंदन प्रस्ताव संमत केला जाईल.

देवेंद्र फडणवीस
Maharashtra Politics : फडणवीस म्हणाले उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, आता शिंदेंच्या नेत्यानं दिला सल्ला, म्हणाले...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग -

शिर्डी येथे भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन रविवारी पार पडणार आहे. विखे पाटलांकडून अधिवेशन स्थळाची पाहणी करण्यात आली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. " साईबाबांच्या पुण्यभूमीत भाजपचे ऐतिहासिक अधिवेशन होत आहे. या अधिवेशनातून महाभरारी घेण्याचा संकल्प करण्यात येणार आहे. देशाचे कणखर गृहमंत्री अमित शहा यांच्या भाषणाने अधिवेशनाची सांगता होईल. विधानसभेप्रमाणे आम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविजयी मिळवायचा आहे. या अधिवेशनातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार आहे, असे जलसंपदा मंत्री विखे पाटील म्हणाले. "

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com