Ahmednagar : शरद पवारांवर टीका करताना गोपीचंद पडळकरांची जीभ घसरली

Gopichand Padalkar On Sharad Pawar : सामच्या प्रतिनिधीने त्यांना विचारलं की, पवार साहेबांची एकीकडे सभा चालू असताना तुम्हाला अडवलं आहे, अंस विचारताच पडळकर आक्रमकपणे म्हणाले की...
BJP MLA Gopichand Padalkar Criticize to NCP Leader Sharad Pawar In Offensive Language in Ahmednagar
BJP MLA Gopichand Padalkar Criticize to NCP Leader Sharad Pawar In Offensive Language in AhmednagarSaam Tv

अहमदनगर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांच्या २९७ व्या जयंतीनिमित्त चौंडी (जामखेड) येथे जयंती सोहळा संपन्न होत आहे. यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) याठिकाणी दाखल झाले आहेत. यावेळी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे देखील याठिकाणी आले. मात्र तणाव निर्माण होऊ नये म्हणून त्यांना पोलिसांनी अडवले. याचा त्यांनी निषेध करत त्यांनी शरद पवारांवर टीका केली. मात्र पवारांवर टीका करताना गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली आहे. (BJP MLA Gopichand Padalkar Criticize to NCP Leader Sharad Pawar In Offensive Language in Ahmednagar)

हे देखील पाहा -

त्यांच्या बापाची चौंडी आहे काय? - पडळकरांची जीभ घसरली

यावेळी सामटीव्हीशी बोलताना पडळकर म्हणाले की, मी लहानपणापासून अहिल्यादेवींच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी चौंडीमध्ये येतो. परंतू आज पोलिसांनी पहिल्यांदा सर्व अहिल्या भक्तांना अडवलं आहे. २००-३०० पोलीस रस्त्यावर थांबवले आणि आम्हाला दर्शनापासून वंचित ठेवलं आहे. पवारांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या प्रशासनाचा निषेध करतो, पवारांचा निषेध करतो, त्यांचा नातू रोहित पवार यांचा मी निषेध करतो असं ते म्हणाले. पुढे सामच्या प्रतिनिधीने त्यांना विचारलं की, पवार साहेबांची एकीकडे सभा चालू असताना तुम्हाला अडवलं आहे, अंस विचारताच पडळकर आक्रमकपणे म्हणाले की, "कोण पवार साहेब? काय त्यांच्या बापाची चौंडी आहे काय? असं म्हणत त्यांनी पवारांवर हल्ला चढवला आहे.

पडळकर पुढे म्हणाले की, पवार साहेब कधी आयुष्यात इथं आले का जयंतीला? या राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री असताना का नाही सरकारी जयंती सुरु केली? देशाच्या राजकारणात, १०-१५ वर्षे केंद्रात मंत्री होता. तुमच्या आयुष्यात वयाच्या ८२-८३ वर्षात तुम्ही एकदाही जयंतीला आला नाहीत. आता या २-३ वर्षात तुम्हाला अहिल्यादेवी कशी काय आठवते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

BJP MLA Gopichand Padalkar Criticize to NCP Leader Sharad Pawar In Offensive Language in Ahmednagar
कुलगाममध्ये पुन्हा काश्मिरी पंडिताची हत्या, दहशतवाद्यांनी शाळेमध्ये झाडल्या गोळ्या

लायकी आहे काय?

पडळकर एवढ्यावरच थांबले नाहीत, पुढे शरद पवारांनाच उद्देशून ते म्हणाले की, रोहित पवार तुमचा इथं आमदार झाला, तुम्ही म्हणतात जिथं माझा नातू रोहित पवार आमदार झाला तिथं अहिल्यादेवींचं जन्मगाव आहे. तुमची लायकी आहे का? अहिल्यादेवींचं जन्मगाव तुमच्या नातवाच्या मतदार संघात सांगण्याची? असं पडळकर आक्रमकपणे म्हणाले. तसेच तुम्ही जो आमचा इतिहास पुसायला निघाला आहात, तुम्ही जे बहुजनांचे लचके तोडायला निघाला आहात, हे लोकं सगळी आता जागी झाली आहेत.अहिल्याभक्तांना दर्शन घेण्यापासून थांबवलं जातंय ही देशातली पहिली घटना आहे, असंही पडळकर म्हणाले आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com