भाजप आमदार देवयानी फरांदे आणि वसंत गीते भिडले, मतदान केंद्राबाहेर गोंधळ
Nashik Lok Sabha Saam tv

Nashik Lok Sabha : नीट बोल, तुमची जहांगिरी आहे का? भाजप आमदार देवयानी फरांदे आणि वसंत गीते भिडले, मतदान केंद्राबाहेर गोंधळ

devyani farande and vasant gite : केंद्रावर मोठ्या संख्येने कार्यकर्ते आल्यानंतर भडकलेल्या आमदार फरांदे यांनी नीट बोल, तुमची जहांगिरी आहे का? असं म्हणत ठाकरे गटाचे वसंत गीते यांना जाब विचारला. त्यानंतर मतदान केंद्राबाहेर एकच गोंधळ पाहायला मिळाला.

नाशिक : नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडत आहे. मतदारसंघातील शेकडो लोक मतदानासाठी घराबाहेर पडत आहेत. याचदरम्यान या मतदारसंघातील एका मतदान केंद्राबाहेर भाजप आणि ठाकरे गटाचे नेते भिडले. त्यानंतर मतदान केंद्राबाहेर एकच गोंधळ पाहायला मिळाला. या मतदान केंद्राबाहेर भाजपच्या आमदार देवयानी फरांदे आणि ठाकरे गटाचे नेते माजी आमदार वसंत गीते आमनेसामने आले.

केंद्रावर मोठ्या संख्येने कार्यकर्ते आल्यानंतर भडकलेल्या आमदार फरांदे यांनी नीट बोल, तुमची जहांगिरी आहे का? असं म्हणत ठाकरे गटाचे वसंत गीते यांना जाब विचारला. त्यानंतर मतदान केंद्राबाहेर एकच गोंधळ पाहायला मिळाला.

भाजप आमदार देवयानी फरांदे आणि वसंत गीते भिडले, मतदान केंद्राबाहेर गोंधळ
Lok Sabha 2024: लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळालं नाही, तर भाजपचा 'प्लान बी' काय? अमित शहांनी स्पष्टच सांगितलं

नाशिकमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये शिंदे गटाकडून हेमंत गोडसे तर ठाकरे गटाकडून राजा वाजे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे मतदारसंघातील मतदान केंद्रावर एकच गर्दी पाहायला मिळत आहे. याच प्रकारे नाशिकमधील भद्रकालीमध्ये हा प्रकार घडला. भद्रकालीतील मतदान केंद्राबाहेर ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. यामुळे भाजपच्या आमदार देवयानी फरांदे भडकल्या. यावेळी भाजप आमदार देवयानी फरांदे आणि ठाकरे गटाचे वसंत गीते भिडले.

'नीट बोल, तुमची जहांगिरी आहे का?, असं म्हणत फरांदे यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना जाब विचारला आहे. यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा केल्या. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले.

भाजप आमदार देवयानी फरांदे आणि वसंत गीते भिडले, मतदान केंद्राबाहेर गोंधळ
Video: लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे आणि ठाकरे एकत्र येणार? प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधान

नेमकं काय घडलं?

दरम्यान, जुने नाशिक, घास बाजार येथील मतदान केंद्रावर माजी महापौर विनायक पांडे आणि भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्यात वाद झाला. यावेळी माजी आमदार वसंत गीते देखील हजर होते. आमदार फरांदे मतदान कार्ड चेक करत असल्याने वाद झाल्याची माहिती मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com