pankaja munde and dhananjay munde
pankaja munde and dhananjay munde SaamTvNews

Maharashtra Politics: बीडमध्ये बहिण-भावामध्ये पुन्हा दरार; धनंजय मुंडे यांच्या टीकेला पंकजा मुंडेंचे जोरदार प्रत्युत्तर

Pankaja Munde News: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
Published on

Beed News: बीडमध्ये मुंडे बहिण-भावाचा राजकीय कलगीतुरा पाहायला मिळाला. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. 'भ्रष्टाचाराच्या संदर्भात कोणी बोलू नये असं मला वाटतं. माझा कारभार सर्वांच्या समोर आहे, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना प्रत्युत्तर दिले आहे. (Latest Marathi News)

जवाहर एज्युकेशन सोसायटी निवडणुकीनिमित्त पंकजा मुंडे यांनी प्रचाराच्या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, 'या निवडणुकीमध्ये मी उभा राहिली आहे. माझ्या समोरचे उभा राहिले आहेत.जे कोणी उभा राहिले आहेत, त्यांच्या प्रचार करणे हे आमचे कर्तव्यच आहे. कॉलेज चालवणं सोपं नाही. त्या ठिकाणी मुलं-मुली येतात. त्यांचा भविष्य आणि सुरक्षितता महत्त्वाचे असते'.

pankaja munde and dhananjay munde
Political News : दौंडच्या सभेत संजय राऊत करणार भाजप आमदाराची पोलखोल, ठाकरे गटाच्या आमदाराचं मोठं विधान

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या टीकेला प्रत्यत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, 'पंकजा मुंडे एक वचनी आहे. मी त्यांच्या विरोधात काहीच बोलले नाही, पंकजा मुंडे एक वचनी आणि एक बाण असल्यासारखे आहे. एकदा शब्द दिला की फिरत नाही'.

'मी जर एखादी जाहीरपणे भूमिका मांडली तर त्याच्या मागे गेली नाही. मी काय वैयक्तिक आरोप केले का? मनोमिलनाची माझ्याकडून प्रसारणा नाही, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना प्रत्युत्तर दिले.

pankaja munde and dhananjay munde
Devendra Fadnavis On Ajit Pawar: अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या दाव्यावर फडणवीसांची सावध प्रतिक्रिया; म्हणाले, कोणालाही...'

राज्यातील राजकीय घडामोडीवर भाष्य करताना पंकजा मुंडे म्हणाल्या, 'महाराष्ट्रात एवढे भूकंप झाले तर महाराष्ट्राचं काय होईल याची मला चिंता आहे. महाराष्ट्राचं राजकारण कसं राहील याची मला चिंता आहे. याचे कुठले संकेत मला असण्याचं काही कारण नाही. कारण मी या प्रक्रियेचा कुठलाही भाग नाही. कार्यकर्त्यांची नेत्यांची गरज आहे, याचा निर्णय घेणाऱ्या प्रक्रियेत मी आहे. त्यामुळे यावर मी काय भाष्य करू शकणार नाही, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी सध्याच्या अस्थिर राजकारणावर अविश्वास दर्शवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com