Sharad Pawar On Girish Bapat Demise: झुंझार नेता हरपला! विरोधकांनाही अश्रू अनावर; राज ठाकरे, शरद पवारांनी दिल्या भावूक प्रतिक्रिया

Girish Bapat Passed Away: राजकारणापलीकडील अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून खासदार गिरीश बापट यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने विरोधकांनीही भावूक प्रतिक्रिया दिली आहे.
Sharad Pawar - Girish Bapat
Sharad Pawar - Girish BapatSaamtv
Published On

Girish Bapat Passed Away: पुण्यातील भाजप नेते खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे आज निधन झाले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून बापट आजारी होते. गिरीश बापट यांच्या निधनाने भाजपला मोठा धक्का बसला आहे. तर राजकीय क्षेत्रातील विरोधकांनाही त्यांच्या जाण्याने अश्रू अनावर झाले आहेत. राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी दुःख व्यक्त केले आहे..

Sharad Pawar - Girish Bapat
Girish Bapat Political Journey: कसब्याचे किंगमेकर! टेल्को कंपनीत कामगार ते सलग ५ वेळा आमदार; लढवय्ये गिरीश बापट यांची राजकीय कारकिर्द

अजातशत्रू व्यक्तिमत्व..

गिरिश बापट हे भाजपातले एक मुरब्बी राजकारणी अशी त्यांची ओळख होती. त्यांचा पुण्यातला जनसंपर्क हा प्रचंड मोठा होता. सर्व पक्षीय नेत्यांशी गिरीश चांगले संबंध होते. त्यांच्या जाण्याने आता भाजपातला पुण्यातला मोठा आधार गेला आहे असं म्हटलं तरीही काहीही वावगं ठरणार नाही.

शरद पवार झाले भावूक...

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी (Sharad Pawar) ट्विट करत गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत गिरीश बापट यांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केला. अशा शब्दांमध्ये शरद पवार यांनी ट्वीट करून त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली आहे.

भाजपची कधीही भरुन न येणारी हानी- अमित शहांची भावूक प्रतिक्रिया..

"पुण्याचे खासदार व भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्या निधनाने भाजपची कधीही भरून न येणारी हानी झाली. बापटजी शेवटच्या श्वासापर्यंत देश व संघटनेच्या हितासाठी समर्पित राहिले. या दु:खाच्या प्रसंगी संपूर्ण संघटन त्यांच्या कुटुंबासोबत उभ आहे. दिवंगत आत्म्यास चिरशांती लाभो. ॐ शांति, अशा शब्दात केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सुप्रिया सुळेंनीही दिली भावूक प्रतिक्रिया...

"माझे लोकसभेतील सहकारी आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले.ही बातमी अतिशय दुःखद आहे. सलग पाच वेळा पुण्यातून ते आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले.त्यांना काही काळ राज्य मंत्रिमंडळातही काम करण्याची संधी लाभली होती. त्यांच्या निधनामुळे एक मनमिळाऊ स्वभावाचे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. भावपूर्ण श्रद्धांजली."

उत्कृष्ठ संसदपटू गमावला- उद्धव ठाकरे

"भाजपचे ज्येष्ठ नेते, खासदार गिरीश बापट जी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक व्यापक जनसंपर्क असलेला नेता आणि उत्कृष्ट संसदपटू गमावला आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना, अशी भावूक प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

राज ठाकरेंचा शोकसंदेश..

पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार, माजी मंत्री, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माझे मित्र श्री. गिरीश बापट ह्यांचं निधन झालं. राजकीय मतभेद हे व्यक्तिगत मैत्रीच्या आड येऊ द्यायचे नसतात, ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती गिरीश बापटांनी कसोशीने पाळली. त्यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ओम शांती.

सुहृदय मित्र गमावला- अजित पवार

"पुणे जिल्ह्याला, राज्याला गिरीशभाऊंची उणीव कायम जाणवेल, त्यांची आठवण कायम येत राहील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. गिरीशभाऊंच्या कुटुंबियांच्या, कार्यकर्त्यांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो, गिरीश बापट यांचं निधन हे पुणे जिल्ह्यातल्या आम्हा सर्वपक्षीय राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे."

महाराष्ट्राचं सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून गिरीशभाऊंकडे पाहिलं जायचं. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी खासदार गिरीश बापट यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com