Maharashtra Legislative Council Elections : सत्यजीत तांबेंना उमेदवारी ? भाजपात खदखद वाढली, अर्ज भरण्यासाठी नेता रवाना

आज काॅंग्रेसचे नेते डाॅ. सुधीर तांबे हे त्यांच्या पक्षातून उमेदवारी भरणार आहेत.
Nashik, Maharashtra Legislative Council Elections, BJP, Dhananjay Jadhav, Satyjeet Tambe
Nashik, Maharashtra Legislative Council Elections, BJP, Dhananjay Jadhav, Satyjeet Tambesaam tv

- सुशील थोरात

Maharashtra Legislative Graduate Constituency Election Latest Updates : विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी अद्याप भाजपाने उमेदवार जाहीर केला नसल्याने भाजपचे समर्थक नाराज झाले आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपचे ऍड. धनंजय जाधव (Dhananjay Jadhav) हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नाशिकला रवाना झाले आहेत. जाधव हे नाराजीतून त्यांचा अर्ज भरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान काॅंग्रेस (congress) युवा नेते सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांच्या भाजप उमेदवारीची आजही चर्चा रंगल्याने आज दुपारनंतर या मतदारसंघातील चित्र स्पष्ट हाेईल. (Maharashtra News)

Nashik, Maharashtra Legislative Council Elections, BJP, Dhananjay Jadhav, Satyjeet Tambe
Maharashtra Politics : 'भाजपात येतो अशी केवळ त्यांची हवा अन् त्यांनी पक्षात आलेले कार्यकर्त्यांना आवडणार नाही'

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी (Nashik Maharashtra Legislative Graduate Constituency Election) नगरचे धनंजय जाधव आणि धुळ्याचे धनराज विसपुते या दोघांनी भारतीय जनता पक्षाकडे (bjp) उमेदवारीची मागणी केली आहे. भाजपने अद्याप कोणत्याही अधिकृत उमेदवाराची घोषणा केलेली नाही. त्यामुळे भाजपात तीव्र नाराजी पसरली आहे.

Nashik, Maharashtra Legislative Council Elections, BJP, Dhananjay Jadhav, Satyjeet Tambe
Maharashtra Legislative Council Elections : सत्यजीत तांबेंच्या ट्विटने सस्पेन्स वाढला; माध्यमांना टाळत तांबे पिता-पुत्र नाशिकला रवाना

याच नाराजीतून भाजपचे ऍड. धनंजय जाधव हे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नाशिकला (nashik) रवाना झाले आहेत. जाधव हे आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतील. दूसरीकडे धुळ्याचे धनराज विसपुते यांच्या हालचालींवर देखील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com