नागपूर : भाजप नेते आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांनी कोट्यवधी रुपयांची बेनामी संपत्ती गोळा केली असून आपण त्याचा साक्षीदार असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांना केला. सुरज तातोडे हे त्यांचे पत्नीचे भाचे आहेत. ऍड.सतीश उके (Adv. Satish Uke) यांनी त्यांना आज नागपूरात आणून पत्रकार परिषद घेतली.
चंद्रशेखर बावनकुळे ऊर्जामंत्री असताना सुरज तातोडे (Suraj Tatode) हे त्यांच्या नागपूर आणि मुंबईतील (Nagpur And Mumbai) बंगल्यावर काम करायचे. कंत्राटदारांकडून मिळालेले भ्रष्टाचाराचे पैसे बावनकुळे सुरज तातोडे यांच्याकडे द्यायचे. दोन वर्षात अंदाजे 100 कोटी काळा पैसा बावनकुळे यांनी ठेवायला दिले, असा दावा तातोडे यांनी केला. एसजी इन्फ्रा, KKC, सरस्वती कन्ट्रक्शन या कंपन्याकडून बावनकुळे यांनी पैसे घेतले, असा आरोपही त्यांनी केलाय.
दरम्यान काळ्या पैशाच्या हिशोबात घोटाळा केल्याचा आरोप बावनकुळे यांनी सुरज तातोडे यांच्यावर केला. 30 लाख रुपये दिले नाही म्हणून त्यांना कामावरून काढून टाकले. त्यांच्या नावावर असलेले नागपुरातील 5 फ्लॅट, 4 कार आणि एका कंपनीतील शेअर्स बावनकुळे यांनी जबरदस्तीने आपल्या नावावर केल्याचा आरोपही तातोडे यांनी केला. सततच्या धमक्या आणी टेन्शन मुळं तातोडे यांना ब्रेन हॅमरेज झाला. त्यातून ते बचावले, मात्र नैराश्याने ते खचले आणि शेवटी ऍड. उके यांच्याकडे आल्याचं त्यांनी सांगितलं.
हे देखील पहा -
ऍड. उके यांनी बावनकुळे हे आज पाच हजार कोटी रुपयांचे मालक आहे. ज्या प्रमाणे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या वर आरोप झाले आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन खटला चालविला जातोय त्याच पद्धतीने बावनकुळे यांच्या विरोधात साक्षीदार आरोप करतोय, त्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल त्यांच्या चौकशी केली जावी, अशी मागणी ऍड. उके यांनी केली. दरम्यान या आरोपा संदर्भात भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उद्या प्रतिक्रिया देणार असल्याचे सांगितले.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.