मुंबई: काल गुडीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी महाविकास आघाडी आणि शिवसेनेवरती सडकून टीका केली होती. त्याचबरोबर त्यांनी मशिदीचे भोंगे आता मुंबईच वाजू दिले जाणार नाहीत अशी भूमिकाही घेतली. त्यावरच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवरती टीका केली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की अक्कल दाढ इतक्या उशिरा कशी येते आता याचा शोध घ्यावा लागेल. भारतीय जनता पक्षाचाच लाऊडस्पिकर काल शिवाजी पार्कवर वाजला. त्यांचीच स्क्रिप्ट होती, लाऊड स्पीकर त्यांचाच होता आणि टाळ्या ही त्यांच्याच होत्या.
मुख्यमंत्री काम करत आहेत मराठी भाषा भवन, मेट्रोच उद्घाटन याचं नेतृत्व करत आहे. त्याच्यावर बोला भोंग्याच काय करायचं यासाठी सरकार समर्थ आहे. शरद पवारांनी (Sharad Pawar) जातीयवाद पसरवला त्याच्या चरणात आपणही जात होता सल्ला मसलत करायला. टोलेजंग माणसावर बोलायचं टाळ्या मिळतात, त्या टाळ्या स्पॉन्सर होत्या अशी खोचक टीक संजय राऊत यांनी केली आहे.
काल राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले राज्याने बहुमत हे युतीला दिले होते आघाडीला नाही. देशाच्या राजकारणात असे कधी झाले नाही ते महाराष्ट्रात घडले असेही राज ठाकरे म्हणाले होते. त्याला उत्तर देताना राऊत म्हणाले की देशात अनेकदा असं झालं आहे. महविकास आघाडीचं बहुमत झालं ते खोटं बोलणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी. सरकार न आल्यानं भारतीय जनता पक्षाची मळमळ दुसऱ्यांच्या भोंग्यातून बाहेर काढली. राज्य पुढे न्यायचं आहे जी संकट आहेत त्यांच्याशी लढा द्यायचा आहे. राज्यातील केंद्रीय तपास यंत्रणांच्या विरोधात लढा द्यायचा आहे. महाराष्ट्रात भगवा फडकवायाचा आहे असेही राऊत यावेळी म्हणाले.
भाजपने काही दिवसांपुर्वी मुंबईतील भोंगे बंद करावेत अशी मागणी केली होती. त्याला काल जाहीर सभेत राज ठाकरेंनी पाठींबा दिला आणि मुंबईत यानंतर मशिदीत भोंगे वाजले तर त्याच्या डबल आवाजात आम्ही हनुमान चालीसा वाजवणार असे म्हणाले होते. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की भाजप शासित कोणत्या राज्यात अजाण बंद केली आहे? लाऊस्पिकर बंद केले आहेत? राज्यात कायद्यातच राज्य चालत आहे. यूपी बिहारचा विकास व्हायला पाहिजे पण राज्याचा विकास होतोय तो दिसत नाही.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.