Amravati: अचलपूर दंगलीतील आरोपींचा भाजपकडून जाहीर सत्कार

'सध्याचा काळ हिंदूंसाठी धोक्याचा, अनेक लोकांवर आरोप नसतानाही गुन्हे दाखल होत आहेत. आम्ही आता जशास तसे उत्तर देऊ.'
BJP Amravati
BJP Amravatiअमर घटारे
Published On

अमर घटारे -

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील एका सभागृहात काल भारतीय जनता पक्षाने कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या मेळाव्यात मागील महिन्यात अचलपूरमध्ये (Achalpur) झेंडा काढण्याच्या वादातून निर्माण झालेल्या दंगलीतील आरोपींचा जाहीर सत्कार करण्यात आला आहे. या आरोपीचा सत्कार केल्यानंतर भाजप पुढील निवडणुका हिंदुत्वाच्या मुद्यावरच लढवणार असल्याची चर्चाही सभागृहात रंगली होती. परतवाडा येथील आयोजित कार्यक्रमात भाजपच्या (BJP) जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी सत्कार केला. यावेळी आयोजित जाहीर कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी शहराध्यक्ष अभय माथने, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण तायडे प्रताप अभ्यंकर, महिला शहराध्यक्ष नयना जोशी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

यावेळी बोलताना भाजपच्या जिल्हाध्यक्ष म्हणाल्या की, "सध्याचा काळ हिंदूंसाठी धोक्याचा आहे. अनेक लोकांवर आरोप नसतानाही गुन्हे दाखल होत आहेत. आम्ही आता जशास तसे उत्तर देऊ. मागच्या अनेक वर्षापासून राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) आमदार आहे. मात्र, अचलपूर विकास खुंटला असून अचलपूर भकास होत आहे." अशी टीकाही जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनीकेली.

हे देखील पाहा -

अचलपूरमध्ये झेंडा काढण्याच्या वादावरून दोन गटात हाणामारी झाली होती. या पार्श्वभूमीवर अचलपूर परतवाडा व कांडली परिसरात कलम १४४ अंतर्गत संचारबंदी लावण्यात आली होती. याच वादाच्या पार्श्वभूमीवर भाजप शहर अध्यक्ष अभय माथने यांना पुण्यातून अटक देखील करण्यात आली होती. मात्र, आता दंगलीतील आरोपींचा सत्कारच भाजपने केल्यामुळे विरोधकांकडून भाजपवर टीका करण्यात येत आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com