BJP Corporator
BJP Corporatorविश्वभूषण लिमये

Solapur: भाजप नगरसेवकाने जीवे मारण्याची धमकी देत केला प्राणघातक हल्ला

''तू आमच्या विरोधात गेलास तर तलवारीने तुकडे करिन आणि फेकून देईन.'
Published on

सोलापूर : ''तू आमच्या विरोधात गेलास तर तलवारीने तुकडे करिन आणि फेकून देईन,"अशी धमकी देत प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी भाजपचे नगरसेवक (BJP Corporator) सुनिल कामाठीसह सात जणांविरुद्ध सोलापुरातील (Solapur) जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय आडगाळे असे मारहाण झालेल्या इसमाचे नाव आहे. संजय आडगाळे आणि सुनिल कामठी हे मागच्या 20 वर्षांपासून एकत्र काम करत होते. मात्र, मागच्या कांही दिवसांपासून आडगाळेनी नगरसेवक कामठी सोबत काम करणे बंद केले, हाच राग मनात ठेऊन कामाठीने हा हल्ला केल्याचा आरोप आडगळेने केला आहे.

BJP Corporator
School: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या जाहीर...

संजय आडगळे याच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरु आहेत. तर भाजपचे नगरसेवक सुनिल कामठी यांचा शोध सोलापूर पोलीस घेत असल्याची माहिती पोलीस निरिक्षक बजरंग साळुंखे यांनी दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com