Solapur: महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला झटका; शहर सरचिटणीसांसह 1 हजार समर्थकांची पक्षाला सोडचिट्टी
Solapur: महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला झटका; शहर सरचिटणीसांसह 1 हजार समर्थकांची पक्षाला सोडचिट्टी विश्वभूषण लिमये

Solapur: महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला झटका; शहर सरचिटणीसांसह 1 हजार समर्थकांची पक्षाला सोडचिट्टी

महापालिकेच्या निवडणुका जाहीर होण्या आधीच पक्षाने अपेक्षित प्रभागातून तिकीट नाकारल्याने पक्षावार नाराज असल्याने पक्ष सोडत असल्याचं प्रधाने यांनी सांगितलं.
Published on

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर सोलापुरात भाजपला (BJP) झटका भाजप शहर सरचिटणीस बिज्जू प्रधाने यांची कार्यकर्त्यांसह पक्षाला सोडचिट्टी दिली आहे. महापालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याआधीच पक्षाने अपेक्षित प्रभागातून तिकीट नाकारल्याने पक्षावार नाराज असल्याने आपण पक्ष सोडत असल्याचं प्रधाने यांनी सांगितलं.

स्वतः पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर जवळपास 1 हजार समर्थक कार्यकर्ते आज भाजप पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. तसंच पक्षातील वरिष्ठानी कोणीतही समजूत घातली नसल्याचंही बिज्जू प्राधान यांनी सांगितलं.

Solapur: महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला झटका; शहर सरचिटणीसांसह 1 हजार समर्थकांची पक्षाला सोडचिट्टी
Chandrakant Patil: चंद्रकांत पाटलांनी जाहीर केली महापालिका निवडणुकीची तारीख

दरम्यान बिज्जू प्रधाने म्हणाले, 'भाजपने आजपर्यंत दिलेल्या सर्व जबाबदाऱ्या मी पार पाडल्या तरीही माझा २०१२ आणि २०१७ मधील निवडणुकांमध्ये थोड्या मतांनी पराभाव झाला, ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली मी काम करतोय ते नेतत्व कमी पडतय आणि माझं खच्चीकरण होत असल्याचं लक्षात आल्याने मी भाजपचा सदस्यत्वाचा राजीनामा असल्याचंही ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com