'भाजप तिसरी जागा सहज निवडून आणू शकते, शिवसेनेनं आपली मतं सांभाळावीत'

'आम्हाला कोणाची कोंडी करायची नाही. मात्र, शिवसेनेने त्यांची मते सांभाळावीत'
BJP/Shivsena
BJP/ShivsenaSaam TV
Published On

रत्नागिरी : आमचे असलेले संख्याबळ आणि आमच्यासोबत असलेले अपक्ष यांच्यामुळे राज्यसभेची (RajyaSabha) तिसरी जागा आम्ही सहज निवडून आणू शकतो. मात्र, शिवसेनेने त्यांची मते सांभाळावीत असं व्यक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केलं आहे. ते आज रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी भाजपने धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचा अर्ज भरला असून याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, दानवे यांनी भाजपचे असणारे संख्याबळ आणि अपक्ष यांच्यामुेळे तिसरी जागा सहज निवडून आणू शकतो असा असा विश्वास यांनी व्यक्त केला. शिवाय यावेळी त्यांनी शिवसेनेने (Shivsena) आपली मतं सांभाळावित असा सल्ला ते देखील दिला आहे.

दानवे म्हणाले, 'आमची पार्टी परिवारवादी पार्टी नाही, आम्हाला कोणाची कोंडी करायची नाही. मात्र, शिवसेनेनी त्यांची मते सांभाळावीत असा अप्रत्यक्ष इशाराच त्यांनी यावेळी दिला आहे. दरम्यान, यावेळी त्यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला भाजपनं फंडींग केल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला होता. त्यांच्या याच वक्तव्यावर उत्तर देताना दानवे म्हणाले, जो दिवा विझला त्याला आगकाडी लावत नाही. असं म्हणत दानवे यांनी खैरेंना टोला लगावला.

ते पुढे म्हणाले, मी राज्याचा अध्यक्ष असताना मोदीं आणि अमित शहा यांना सांगून संभाजीराजे (SambhajiRaje Chhatrapati) यांना बोलावून राष्ट्रपती कोट्यातून उमेदवारी दिली. संभाजीराजेंचा भाजपने सन्मान राखला. मात्र, मला दिलेला शब्द शिवसेनेनी पाळला नाही असा संभाजीराजे यांनी आरोप केला आहे. राजेंचा हा अपमान कुणी केला हा निर्णय जनतेनी करावा. राजेंच्या गादीचा भाजपने नेहमीच सन्मानच केलाय असं सांगत रावसाहेब दानवे यांनी संभाजी राजें छत्रपतीच्या उमेदवारीवर वक्तव्य केलंय.

BJP/Shivsena
आम्हाला घोडेबाजार करायचा नाही; मविआने एक उमेदवार मागे घ्यावा - फडणवीस

राज्य केंद्र सरकारला किती पैसे देणे आहे आणि केंद्र सरकार राज्याला किती पैसे देणं आहे. याचा हिशेब काढा, राज्य सरकारने आमच्या सोबत बसून चर्चा करावी असं आव्हान केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारला दिलं आहे.

राज्य सरकारकडून कोशळ्याचे तीन हजार कोटी, पाच हजार कोटी दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर प्रकल्प आणि मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी केंद्राने आपला पैसा दिला. गुजरातने त्यांच्या वाट्याचा पैसा दिला. मात्र, आपल्या राज्याने एक लाल पैसा अँग्रिमेंट असताना देखील दिलेला नाही. त्यामुळे राज्य सरकार सोबत आम्ही केव्हाही हिशोबाला बसायला तयार असल्याचंही दानवे म्हणाले. जीएसटीचा पैसा आम्ही राज्य सरकारला देवूच पण आमच्या पैशाचं काय याचा विचार राज्य सरकारनं करावा असंही दानवे म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com