मोठी बातमी: शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांची ईडीकडून तब्बल 12 तास चौकशी...

यामध्ये पथकाकडून अर्जुन खोतकर यांचे बंधू संजय खोतकर यांच्या कृषी उत्पन्न बाजर समितीच्या खोतकर बिजनेस सेंटर येथील कार्यालयाची झाडा झडती ईडीकडून घेण्यात आली.
मोठी बातमी: शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांची ईडीकडून तब्बल 12 तास चौकशी...
मोठी बातमी: शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांची ईडीकडून तब्बल 12 तास चौकशी...Saam TV

जालना: गेल्या दिवसांपूर्वी औरंगाबाद शहरातील दोन व्यापाऱ्यांच्या कार्यालयावर छापेमारी केल्यानंतर ईडीकडून जालन्यातील शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांची तब्बल 12 तास चौकशी करण्यात आली आहे. ईडीच्या 12 सदस्य असलेले ईडीच्या चार पथकांकडून जालन्यात ही चौकशी करण्यात आली आहे. (Big news: Shiv Sena leader Arjun Khotkar was interrogated by ED for 12 hours)

हे देखील पहा -

या मध्ये पथकाकडून अर्जुन खोतकर यांचे बंधू संजय खोतकर यांच्या कृषी उत्पन्न बाजर समितीच्या खोतकर बिजनेस सेंटर येथील कार्यालयाची झाडा झडती घेण्यात आली. यावेळी पथकाकडून काही कागदपत्रंही तपासण्यात आली, त्यानंतर कृषी उत्पन्न बाजर समितीच्या कार्यालयातही ईडीच्या पथकाकडून चौकशी करण्यात आली. यावेळी खोतकर बिजनेस सेंटर उभारण्यासाठी कृषी उत्पन्न बाजर समितीकडून देण्यात आलेला ठराव, बिजनेस सेंटरमध्ये उभारण्यात आलेल्या गाळ्याच्या लिलावाच्या व्यवहाराचे कागदपत्रंही तपासण्यात आली. दुपारी दोनच्या सुमारास ईडीचे पथक अर्जुन खोतकर यांचं निवास्थान असलेल्या दर्शना बंगल्यावर दाखल झालं. या ठिकाणी पथकाकडून अनेक कागदपत्रांची ही तपासणी केल्याची माहिती समोर आली आहे.

मोठी बातमी: शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांची ईडीकडून तब्बल 12 तास चौकशी...
त्यांच्या ईडीबीडीला आम्ही भीक घालत नाय; आमचं 'दुकान' मोठंच! - आ. राजेंद्र शिंगणे

ईडीच्या पथकाकडून रात्री उशिरा 2 पर्यंत ही चौकशी करण्यात आली. त्यानंतर खोतकर यांची चौकशी संपली आणि ईडीचे पथक औरंगाबादकडे (Aurangabad) रवाना झाले. ईडीकडून खोतकर यांची सलग 12 तास चौकशी करण्यात आली, यामुळे राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) एकच खळबळ उडाली आहे. तब्बल 12 तासांच्या या चौकशीत ईडीच्या हाती काय लागले हे ईडीच्या अहवालानंतरच सामोर येणार आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com