vitthal rukmini pandharpur, Vitthal Rukmini mandir News, Pandharpur latest Marathi news
vitthal rukmini pandharpur, Vitthal Rukmini mandir News, Pandharpur latest Marathi newssaam tv

मूर्ती संवर्धनासाठी यापुढे देवाच्या चरणावर अभिषेक; मंदिर समितीचा मोठा निर्णय

मंदिरातील फुलांची आरास देखील मर्यादीत स्वरूपात करावी अशी‌ सूचनाही मंदिर समितीला दिला आहे.
Published on

पंढरपूर - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या (Pandharpur) विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी पुरातत्व विभागाने काही महत्त्वाच्या व कठोर सुचना मंदिर समितीला दिल्या आहेत. त्यानुसार पूजे दरम्यान मूर्तीवर केले जाणारे पंचामृताचे अभिषेक या पुढे मूर्तीवर न करता देवाच्या चरणावर चांदीचे कृत्रिम पाय ठेवून त्यावर अभिषेक केले जाणार आहेत, अशी‌ माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी आज दिली.

हे देखील पाहा -

विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या चरणांची झीज झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर मंदिर समितीने पुरातत्व विभागाला माहिती दिली होती. त्यानुसार आज पुरातत्व विभागाचे श्रीकांत मिश्रा यांनी आज पहाटे मंदिरात येऊन विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीची पाहाणी केली. पाहाणी नंतर त्यांनी मूर्तीचे संरक्षण आणि संवर्धन व्हावं यासाठी मंदिर समितीला काही महत्त्वाच्या आणि कठोर सुचना दिल्या आहेत. यामध्ये मूर्तीवर केल्या जाणाऱ्या पंचामृतांच्या अभिषेकाचा मुद्दा प्रकर्षाने मांडण्यात आला. त्यानंतर मूर्तीवर केला जाणारा अभिषेक यापुढे चरणांवर चांदीचे पाय ठेवून त्यावर अभिषेक करण्याचा महत्व पूर्ण निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.

vitthal rukmini pandharpur, Vitthal Rukmini mandir News, Pandharpur latest Marathi news
१७ वर्षीय युवकाचा शेजारी राहणाऱ्या ५ वर्षाच्या मुलीवर बलात्कार; पोलिसांकडून अटक

मंदिरातील फुलांची आरास देखील मर्यादीत स्वरूपात करावी अशी‌ सूचनाही मंदिर समितीला दिला आहे. लवकरच रूक्मिणी मूर्तीवर वज्रलेप केला जाणार असल्याचेही गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com