आज पालखी मार्गांचे PM मोदींच्या हस्ते भूमिपूजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचा भूमिपूजन सोहळा पार पडणार
आज पालखी मार्गांचे PM मोदींच्या हस्ते भूमिपूजन
आज पालखी मार्गांचे PM मोदींच्या हस्ते भूमिपूजनSaam Tv
Published On

पंढरपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांच्या हस्ते आज संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग Dnyaneshwar Maharaj Palkhi आणि संत तुकाराम महाराज पालखी Tukaram Maharaj Palkhi मार्गाचा भूमिपूजन Bhumi Pujan सोहळा पार पडणार आहे. हा पालखी मार्ग वारकरी संप्रदायाकरिता उभारण्यात येत आहे. आज ऑनलाईन माध्यमातून हा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे.

आज दुपारी साडे ३ वाजेच्या सुमारास हा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. जवळपास १० कोटींचा हा पालखी मार्ग आहे. या सोहळ्याला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत. या दोन्ही मार्गाच्या चौपदरीकरणाची पायाभरणीचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

हे देखील पहा-

संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग हा पंढरपूर ते आळंदी असा राहणार आहे. संत तुकाराम महाराज पालखी मार्ग देहू ते पंढरपूर असा हा मार्ग असणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या NH-965 पाच विभागांचे चौपदरीकरण, तर श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या NH-965G तीन विभागाचे चौपदरीकरण होणार आहे. आषाढी वारीकरिता किंवा कार्तिकी एकादशीला आळंदी आणि देहू मधून लाखो प्रमाणात वारकरी पंढरीच्या वाटेवर असतात.

आज पालखी मार्गांचे PM मोदींच्या हस्ते भूमिपूजन
एसटीला पुन्‍हा ब्रेक! जिल्ह्यातील आगारांतून बाहेर पडली नाही एकही बस

यामुळे या राष्ट्रीय महामार्गातून दोन्ही बाजूस पालखीकरिता समर्पित असे पदपथ बांधले जाणार आहेत. या महामार्गामुळे भाविकांना त्रासमुक्त आणि सुरक्षित असा रस्ता मिळणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर दिवेघाट ते मोहोळ असा २२१ किलोमीटर, तर संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर पाटत ते तोंडळे- बोंडाळे असा १३० किलोमीटरचे चौपदरीकरण आणि वारकऱ्यांसाठी पदपथाची बांधणी केली जाणार आहे. त्याकरिता अनुक्रमे ६ हजार ६९० कोटी आणि ४ हजार ४०० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com