Chhagan Bhujbal: आरक्षणाचा लढा, नेतृत्वावर घसरला? बीडच्या सभेत भुजबळांकडून लाव रे तो व्हिडीओ

Bhujbal vs Wadettiwar OBC Leadership Controversy: हैदराबाद गॅझेटियरला विरोध करण्यासाठी सुरु झालेल्या ओबीसी आंदोलनात नेतृत्वावरुन फूट पडलीय... आणि त्याला कारण ठरलीय भुजबळांनी वडेट्टीवारांवर केलेली टीका.. मात्र भुजबळांनी वडेट्टीवारांना कसं घेरलंय आणि त्यावरुन वडेट्टीवारांनी कसं प्रत्युत्तर दिलंय?
Chhagan Bhujbal and Vijay Wadettiwar face off over OBC leadership during Beed rally — tension rises within the movement.
Chhagan Bhujbal and Vijay Wadettiwar face off over OBC leadership during Beed rally — tension rises within the movement.Saam Tv
Published On

हैदराबाद गॅझेटियरविरोधात ओबीसी समाजाने वज्रमूठ आवळली असताना ओबीसी नेत्यांमध्ये नेतृत्वावरुन फूट पडलीय..... बीडच्या सभेत भुजबळांनी लाव रे तो व्हिडीओ म्हणत जरांगेंच्या मागणीला पाठींबा देणारा विजय वडेट्टीवारांचा व्हिडीओ दाखवून हल्लाबोल केलाय..

आता भुजबळांच्या टीकेनंतर वडेट्टीवारांनी भुजबळांचा उल्लेख थेट भाजपच्या फेक नॅरेटिव्हच्या फॅक्टरीतील नेता, असा केलाय.. एवढंच नाही नागपूरच्या मेळाव्याला मिळालेल्या प्रतिसादामुळेच भुजबळांना पुढं केलं जातंय, असा पलटवार वडेट्टीवारांनी केलाय... त्यावर वडेट्टीवारांच्या भुमिकेत सातत्य नाही... त्यामुळेच वडेट्टीवारांच्या भुमिकेला राजकीय वास येत असल्याची टीका भुजबळांनी केलीय.. विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळांमध्ये जुंपल्यानंतर आता या वादात बबनराव तायवाडेंनीही उडी घेत भुजबळांनी मनाचा मोठेपणा दाखवायला हवा होता, अशी भूमिका मांडलीय...

एका बाजूला ओबीसी नेतेच आपापसात भिडल्यानं जरांगेंच्या हाती आयतं कोलित मिळालंय.. त्यावरुन त्यांनी वडेट्टीवारांना जुन्या भूमिकेवर येण्याचं आवाहन केलंय..

खरंतर जरांगेंच्या आंदोलनानंतर मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यास सुरुवात झाली... आधी कुणबी नोंदींच्या शोधमोहिमेला विरोध करण्यासाठी 17 नोव्हेंबर 2023 ला भुजबळ आणि वडेट्टीवार एकाच व्यासपीठावर आले... त्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या मेळाव्यापासून अंतर राखलं...मात्र या दरम्यान दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका आणि भुमिकांवर शंका घेणं टाळलं होतं.. मात्र आता बीडच्या सभेतून भुजबळांनी वडेट्टीवारांवर टीका केल्यानं नेतृत्वासाठीचा हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.. या नेतृत्वासाठीच्या संघर्षामुळे आरक्षण वाचवण्यासाठी पोटाला चिमटा काढून रस्त्यावर उतरणाऱ्या गावगाड्यातील ओबीसी चळवळीचं दुरगामी नुकसान होणार हे मात्र निश्चित.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com