भंडारदरा धरण ओव्हर फ्लो; धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग

भंडारदरा धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
भंडारदरा धरण ओव्हर फ्लो; धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग
भंडारदरा धरण ओव्हर फ्लो; धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंगगोविंद सोळुंके
Published On

अहमदनगर - उत्तर नगर जिल्ह्याला जीवनदायिनी ठरलेल्या भंडारदरा धरण Bhandardara Dam पूर्ण क्षमतेने भरले आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची Rain जोरदार बॅटिंग सुरूअसून मोठ्या प्रमाणात धरणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे भंडारदरा पूर्ण क्षमतेने धरण भरलेअसून धरणाच्या स्पिल्वे मधून 3 हजार 200 क्युसेक्सने पाणी निळवंडे धरणात Nilwande Dam सोडण्यात आले आहे.

हे देखील पहा -

भंडारदरा धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. धरण लाभक्षेत्रात जोरदार पावसाची बॅटिंग सुरु आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सलग तीन दिवसांपूर्वी पावसाने दांडी मारली होती. मात्र आता पावसाने चांगलीच बेटिंग सुरू केल्याने घाटघर, रतनवाडी, पांजरे आणि हरिश्चंद्राच्या पर्वत रांगामध्ये पावसाची जोरदार हजेरी सुरू आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक भंडारदरा धरणात होत आहे.

भंडारदरा धरण ओव्हर फ्लो; धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग
गुजरातचा पुढचा मुख्यमंत्री कोण? 'ही' 5 नावं चर्चेत

दरवर्षी 15 ऑगस्टला भंडारदरा धरण भरत असते मात्र यंदा हे धरण 12 सप्टेंबरला भरले आहे. धरणावर सध्या धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळत असून पाण्याची आवक वाढल्यास वीसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होऊ शकते त्यामुळे प्रवरा नदीकाठच्या रहिवाशांनी आपली व आपल्या पशुधनाची विशेष काळजी घ्यावी असे अवाहन पाठबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com