रोहयो मजुरांवर रानडुकराचा हल्ला; तीन मजूर जखमी

रोहयो मजुरांवर रानडुकराचा हल्ला; तीन मजूर जखमी
Bhandara News
Bhandara NewsSaam tv

भंडारा : रोजगार हमी योजनेच्या नाला खोलीकरण कामावरील मजुरांवर झुडपात दडून बसलेल्या रानडुकराने हल्ला केल्याची घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या मोहाड़ी तालुक्यातील हिवरा गावाजवळ घडली. यात तीन मजूर जखमी झाले आहेत. (bhandara news Wild boar attack on Rohyo laborers Three laborers injured)

Bhandara News
‘सुरक्षा अनामत’बाबत वीज ग्राहकांना दिलासा

उन्हाळ्यात मजुरांच्या हाताला काम मिळावे; या उद्देशाने राज्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात विकासाची कामे केली जात आहे. मोहाडी तालुक्यातील हिवरा (वासेरा) ग्रामपंचायतींतर्गत घनश्याम वाढई ते पांजरा शिवपर्यंत नाला खोलीकरणाचे काम सुरू आहे. या कामावर १९० मजूर काम करत आहेत. नाल्यात उगवलेल्या उंच व घनदाट गवताच्या झुडपात लपून असलेल्या एका मोठ्या रानडुकराने अचानक मजुरांवर हल्ला केला.

तीन मजूर जखमी

मजुरांची संख्या जास्त असल्याने त्याला पिटाळून लावण्यात आले. मात्र या हल्ल्यात तीन मजूर जखमी झाले आहे. जखमीत श्रीराम अळमाचे (वय 55), सुनंदा राजू गायधने (वय 28) व सुमन अशोक झंझाड (वय 56) असे जखमी मजूरांची नावे आहे. त्यांना तत्काळ मोहाडी ग्रामीण रुग्णालयात (Hospital) दाखल केले असुन गंभीर जखमी महिला मजूर सुनंदा गायधने यांच्या पायाला गंभीर इजा झाल्याने त्यांना भंडारा रुग्णालयात पुढील उपचारांसाठी पाठविण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com