Beed ATM CCTV : चारचाकी घेऊन एटीएम फोडायला निघाले, घडलं उलटंच अन् तोंडावर आपटले; पाहा VIDEO

Beed Viral Video : गाडीने एटीएम मशीन उघडत असताना चोरटा देखील चांगलाच तोंडावर आपटला.
Beed News
Beed News Saam TV

Beed News :

बीडच्या येळंबघाट येथील महाराष्ट्र बँकेचे एटीएम मशीन उखडून नेण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र टेक्नॉलॉजीमुळे याची माहिती एटीएम हेड ऑफिसला माहित झाली. त्यांनी तात्काळ नेकनूर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. अवघ्या काही मिनिटात नेकनूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळावर पोहचले.

पोलीस येत असल्याचे पाहून चोरट्याने पळ काढला. मात्र ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. डोक्याला टोपी, तोंडाला रुमाल, हातात ग्लोज घालून चारचाकी वाहन घेऊन चोरटे आले होते. हे सर्व सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. (Latest Marathi News)

Beed News
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे पावसात भिजत शेतीच्या बांधावर पोहोचले, शेतकऱ्यांची समस्या ऐकून गहिवरले

गाडीने एटीएम मशीन उघडत असताना चोरटा देखील चांगलाच तोंडावर आपटला. सदरची घटना मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नेकनूर पोलिसांचे कौतुक होत आहे.

मध्यरात्री 3 च्या सुमारास इर्टिगा गाडीमधून आलेल्या ३ ते ४ चोरट्यांनी अगोदर इर्टिगा गाडी एटीएम असलेल्या ठिकाणी लावली. त्यामधून दोन चोरटे बाहेर उतरले. त्यांच्या डोक्याला टोपी होती, तोंडाला रुमाल बांधला होता. हातात ग्लोज होते. या चारेट्यांनी सर्वप्रथम एटीएमच्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीवर ब्लॅक स्प्रे मारला.

Beed News
Biker Was Dragged up to 30 Feet: बसने दुचाकीस्वाराला ३० फुटांपर्यंत फरपटत नेलं; अपघातात तरुणाचा मृत्यू

गाडीची डिक्की उघडली. त्यातील दोरखंड बाहेर काढून तो एटीएम मशीनला बांधला. हे सर्व कृत्य एटीएम मशीनमध्ये असलेल्या कॅमेर्‍यामध्ये कैद झालं आहे. बांधलेल्या दोरातून एटीएम मशीन एका झटक्यात चोरट्यांनी बाहेर काढले.

त्याच वेळी सुरक्षेच्या दृष्टीने वापरलेल्या यांत्रिक उपकरणामुळे एटीएमची छेडछाड होत असल्याचे महाराष्ट्र बँकेच्या मुख्य शाखेला समजले. त्यांनी तात्काळ नेकनूर पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने अत्यंत घटनस्थळ गाठलं. पोलिसांना पाहून चोरट्यांनी एटीएम मशीन तिथेच सोडून पळ काढला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com