बीड : बीडच्या परळीमध्ये गणेशोत्सवानंतर आता नवरात्र उत्सवात लावणी महोत्सवाच्या नावाखाली अश्लील नृत्य पाहायला मिळाले आहे. यामुळे पोलिसांना (Police) देखील लाठीमार करावा लागला. (Beed Navratri News)
नवरात्र उत्सवानिमित्त (Navratri Festival) संत भगवान बाबा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नेते फुलचंद कराड यांनी सार्वजनिक दुर्गा महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवानिमित्त सिने अभिनेत्री तेजश्री प्रधानला बोलावण्यात आले होते. त्यामुळे तेजश्री प्रधानला पाहण्यासाठी परळीकरांनी (Parali) मोठी गर्दी केली होती. महोत्सवाचे उद्घाटन झाल्यानंतर लावण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये लावण्यांच्या नावाखाली अश्लील नृत्य सादर करण्यात आल्याचे दिसून आले.
पोलिसांकडून लाठीमार
दरम्यान परळीतील गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना पुन्हा लाठीमार करावा लागला. गणेशोत्सवात देखील धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून असेच अश्लील नृत्य महाराष्ट्राने पाहिले होते. आता त्यानंतर मुंडेंच्याच परळीत सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली असं चित्र पाहायला मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.