Beed News : ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाविकासआघाडीत बिघाडी; राष्ट्रवादीने घेतला मोठा निर्णय

बीड जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायतीच्या निवडणुका राष्ट्रवादीने स्वबळावर लढवण्याचा नारा दिला आहे.
Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadi Saam tv
Published On

Beed News : बीड जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायतीच्या निवडणुका राष्ट्रवादीने स्वबळावर लढवण्याचा नारा दिला आहे. यामुळं बीडमध्ये (Beed) ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आज बीड शहरातील राष्ट्रवादी भवन येथे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात माहिती दिली आहे.

Mahavikas Aghadi
Crime News : सासू सासऱ्याला झोपेच्या गोळ्या देऊन सून प्रियकरासोबत फरार; दागिनेही केले लंपास

विधानसभा, विधान परिषद आणि लोकसभा या निवडणुका महाविकास आघाडीने (Mahavikas Aaghadi) एकत्रित लढवायचे ठरवलं असलं तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलं आहे. असं देखील राजेश्वर चव्हाण म्हणाले. त्यामुळे ग्रामीण भागातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी मध्ये बिघाडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

उद्धव ठाकरे 'मविआ'तून बाहेर पडणार?

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने देशभरात खळबळ माजली आहे. राज्यातील महाविकास आघाडीतील मित्र पक्षांची यामुळे अडचण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आघाडीत बिघाडी झाल्याचं स्वतः शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज सकाळी प्रतिक्रिया देताना स्पष्ट संकेत दिलेत.

Mahavikas Aghadi
MSRTC Employees : एसटी कामगारांसाठी आनंदाची बातमी; CM शिंदेंनी घेतला मोठा निर्णय

सावरकरांच्या मुद्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मोठी कोंडी झालीय. शिवसेनेची भूमिका आणि काँग्रेसची भूमीका दोन्ही विरुद्ध टोक असल्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस महाविकास आघाडीत अस्वस्थ आहेत. राहुल गांधींची सावरकरांबद्दलची भूमिका ठाकरे गटात अस्वस्थाता निर्माण करत आहे. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com