अतिवृष्टीत वाहून गेलेल्या पुलाचा प्रश्न जैसे थे; तर पुलावर झोपून आंदोलन

अतिवृष्टीत वाहून गेलेल्या पुलाचा प्रश्न जैसे थे; तर पुलावर झोपून आंदोलन
Beed News
Beed NewsSaam tv

बीड : बीडच्या पुसरा गावातील अतिवृष्टीने वाहून गेलेल्या पुलाचा प्रश्न जैसे थे असल्याने परिसरातील 13 गावातील ग्रामस्थांच्या दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे या गाव परिसरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने, नदीला पूर आला होता. या दरम्यान दुचाकीवर गावाकडे येत असतांना खचलेल्या (Beed) पुलाचा अंदाज न आल्याने, गावातील दोन व्यक्ती वाहून जातांना सुदैवाने वाचले आहेत. (beed news bridge carried away by the heavy rains movement sleeping on the bridge)

वडवणी तालुक्यातील पुसरा गाव परिसरात असणाऱ्या नदीवरील पूल, गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीने वाहून गेला. अनेक वेळा निवेदन दिले, तक्रारी केल्या मात्र प्रशासनाने याची दखल घेतली नाही. याचा परिणाम म्हणजे गेल्या दोन दिवसांपूर्वी या परिसरात जोरदार (Rain) पाऊस झाल्याने नदीला पूर आला होता. या दरम्यान या नदीवरील पुलावरून गावाकडे येत असतांना, पाण्याचा अंदाज न आल्याने, गावातील हारुण सलीम कुरेशी (वय 42) हे दुचाकीसह वाहून गेले. यावेळी त्यांनी दुचाकी सोडून झाडाच्या सहाय्याने बाहेर निघाल्याने सुदैवाने जिवितहानी टळली आहे. दरम्यान येणाऱ्या 15 दिवसात पुलाचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा पुलावर झोपून आंदोलन करू.असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com