BJP Pankaja Munde News : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पुन्हा एकदा एक मोठं विधान केलं आहे. 'मी कुणाला काम दिलं तर मला काम मिळेल, सद्या मी बेरोजगारच आहे. त्यामुळे मी कुणाला काम देऊ शकत नाही', असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. परळी शहरात संत भगवानबाबा प्रतिष्ठान तर्फे आयोजित सार्वजनिक दुर्गा मोहत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाला पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली. यावेळी बोलतांना त्यांनी हे विधान केलं आहे. (Latest Marathi News)
पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की 'मी तुझ्याबद्दल अफवा पसरवतो, तू माझ्याबद्दल अफवा पसरव. मी तुला ट्रोल करतो, तू मला ट्रोल कर. हे सोशल मीडियाचं युद्ध आहे'. असं म्हणत त्यांच्या वादग्रस्त वक्त्यावरून झालेल्या ट्रोलिंग वर भाष्य केलं.
'जुन्या काळातलं युद्ध वेगळं होतं. नव्या काळातलं युद्ध वेगळं आहे. साहेबांच्या वेळचे नेते वेगळे होते, परिस्थिती वेगळी होती, कार्यकर्ते वेगळे होते. आत्ताचं युद्ध वेगळं आहे..हे युद्ध सोशल मीडिया वर लढले जातं', असे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. (Maharashtra News)
'सोशल मीडियावर लढलं जातं. तलवारी, भाले, ढाली यांची काहीच गरज नाही. मी तुझ्याबद्दल अफवा पसरवतो, तू माझ्याबद्दल अफवा पसरव. मी तुला ट्रोल करतो, तू मला ट्रोल कर. हे सोशल मीडियाचं युद्ध आहे. आपण यामध्ये बसत नाही. आपण सगळे आपापलं काम करत असतो', असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.