बीडच्या माजलगाव तालुक्यातील सावरगांव येथे भाजप खासदार यांचा ताफा अडवण्यात आल्याची बातमी समोर येत आहे. मराठा तरुणांनी त्यांचा ताफा अडवल्याचं सांगण्यात येत आहे. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे.
आरक्षणाबद्दल भूमिका जाहीर करा, नाहीतर तुम्हाला बीड जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशाराही मराठा तरुणांनी दिला आहे. यावेळी आंदोलक तरुणांनी घोषणाबाजीही केली. यावरच मराठा समाज आता आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
तसेच आता मराठा आरक्षणाच्या मागणीवरून लोकप्रतिनिधींना जवाब विचारायला सुरुवात केली आहे. भाजपा खासदार प्रीतम मुंडे या दिव्यांगाच्या कार्यक्रमासाठी माजलगावमध्ये आल्या होत्या. यावेळी माजलगावहून परतत असताना त्यांचा ताफा अडवून मराठा तरुणांनी घोषणाबाजी केली. (Latest Marathi News)
राजकारण्यांना गावात नो-एन्ट्री
दरम्यान, संभाजीनगर जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यातील राजुर- फुलंब्री नेशनल हायवे वरील कोलते टाकली गावातील आरक्षणाच्या मागणीसाठी लागलेला बोर्ड सगळ्यांचे लक्ष वेधत आहे. गावातील तरुणांनी अक्षरशः मराठा आरक्षण मिळेपर्यंत पुढाऱ्यांना गावबंदी करत आगामी सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालत निवडणूक बंदीचा ही निर्णय घेतला आहे.
याबाबतचा ठरावही या गावातील तरुणांनी ग्रामपंचायत कार्यालयात घेऊन तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनाही तो पाठवला आहे. तसेच नेशनल हायवे 752 वर जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कुठल्याही पक्षाच्या नेत्याला टाकळी कोलते गावात प्रवेश बंद करण्यात आला आहे. यानंतरही कोणी प्रवेश केल्यास हात पाय तोडून गळ्यात बांधण्यात येईल, असे बोर्डही लिहिले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.