बीड : बीड जिल्हा परिषदेतील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. ५६८ पदांसाठी होत (Beed) असलेली मेगाभरतीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्या परिषदेकडे ५६८ पदांसाठी तब्बल २१ हजार १३१ अर्ज दखल झाले आहेत. (Latest Marathi News)
बीड जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबविली जात आहे. या भरतीसाठी परीक्षा व इतर सर्व जबाबदारी आयबीपीएस या कंपनीकडे दिली आहे. जिल्हा परिषदेतील रिक्त पदांबाबत शासनाला माहिती कळविल्यानंतर या मेगा भरतीचा निर्णय झाला असून २५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची (Beed ZP) मुदत होती. त्यानुसार रिक्त जागांसाठी उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.
रिक्त पदांच्या तुलनेत ३८ पट अर्ज
सरळ सेवेने भरण्यात येणाऱ्या ५६८ पदांसाठी सुमारे २१ हजार १३१ इच्छुक तरुणांनी नोकरीच्या आशेने अर्ज केले आहेत. जागांच्या तुलनेत प्राप्त अर्जाची संख्या पाहता हे प्रमाण जवळपास ३८ पट इतके आहे. दरम्यान यावरून बेरोजगारीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.