आम्ही एकाच छताखाली राहतो; मात्र एकमेकांचे तोंडही पाहत नाही - योगेश क्षीरसागर

क्षीरसागर बंधूतील वाद वाढण्याची शक्यता...
आम्ही एकाच छताखाली राहतो; मात्र एकमेकांचे तोंडही पाहत नाही - योगेश क्षीरसागर
आम्ही एकाच छताखाली राहतो; मात्र एकमेकांचे तोंडही पाहत नाही - योगेश क्षीरसागरSaamTvNews
Published On

बीड - आम्ही एकाच छताखाली राहतोय; मात्र एकमेकांचे तोंडही पाहत नाही किंवा आम्ही काही सिनेस्टाईल देखील एकमेकांकडे पाहत नाही. असं म्हणत "दोन्ही क्षीरसागर एकचं आहेत" म्हणणाऱ्यांना माजी नगरसेवक योगेश क्षीरसागर यांनी चांगलंच उत्तर दिलंय. त्याचबरोबर जागेच्या रजिस्ट्री वरून घडलेली घटना आणि दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे, याच्याशी आमचा संबंध नाही. आम्ही मालक नसताना किंवा उपस्थित नसताना जाणीवपूर्वक खोटे गुन्हे दाखल करून, आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे गोळीबार झालेल्या त्या रजिस्ट्री कार्यालयातील हार्डडिस्क कशी काय गायब होते? ती गायब झाली का ? कुणी गायब केली? असा सवाल माजी नगरसेवक योगेश क्षीरसागर यांनी उपस्थित केलाय. ते बीडमधील गोळीबार प्रकरणावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

हे देखील पहा :

बीडमधील क्षीरसागर बंधूतील वाद सर्वश्रुत असताना, बीडमधील गोळीबार प्रकरणाने क्षीरसागर बंधू पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. क्षीरसागर बंधूतील दोन्ही पिता पुत्रांवर परस्पर गुन्हे दाखल झाल्याने, हा वाद उफाळून आलाय. तर दाखल गुन्ह्यातून अंतरिम जामीन मिळाल्यानंतर नगरसेवक योगेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषद घेऊन, आपल्यावर दाखल झालेले गुन्हे खोटे आहेत म्हणत, एकप्रकारे खुलं चॅलेंज दिलं आहे.

आम्ही एकाच छताखाली राहतो; मात्र एकमेकांचे तोंडही पाहत नाही - योगेश क्षीरसागर
भगतसिंह कोश्यारी यांची राज्यपाल पदावरुन हकालपट्टी करा - OBC एकीकरण समिती

यावेळी ते म्हणाले, की बीडमध्ये आम्ही आज तरी एका छताखाली राहतो. पण, आम्ही एकमेकांचे चेहरे ही पाहत नाही. मलाही याबद्दल अनेकजण विचारतात. पण, घर म्हणून एकत्र असलो तरी आमचे परस्पर संबंध काहीच नाहीत, या शब्दात योगेश क्षीरसागर यांनी एका छताखाली राहणाऱ्या क्षीरसागरांमधील वादावर भाष्य केले. क्षीरसागर सर्व एकत्र राहतात पण बाहेर भांडणे दाखवितात त्यामुळे आपण एकच आहात का? असा सवाल विचारल्यावर आम्ही काही सिनेस्टाईल एकमेकांकडे पाहत नाही. काकुंचे कुटुंब असल्यामुळे एका छताखाली राहतो. पण, एकमेकांशी कधी बोलतही नाही, असं योगेश क्षीरसागर म्हणाले. दरम्यान, क्षीरसागर बंधूंमध्ये नगरपालिका निवडणूकीपूर्वी वादंग सुरू झाल्यानं राजकीय वातावरण तापलं असून हा वाद वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com