बीड : डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आरोग्य विभागाच्या आयुक्त आरोग्य सेवा पदाचा पदाभार स्वीकारल्यानंतर मराठवाडा दौऱ्याला सुरूवात केली आहे. आज तुकाराम मुंढे हे बीडमध्ये (Beed) आले होते. त्यांनी जिल्हा रुग्णालयाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. (Beed News Today)
आता प्रायव्हेट प्रॅक्टिस केली तर थेट डिसमिस करणार, असं म्हणत मुंढे (Tukaram Mundhe) यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. प्रायव्हेट प्रॅक्टिस करणाऱ्यांसाठी ही लास्ट वार्निंग आहे असं म्हणत मुंढे यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना कडक शब्दात इशारा दिला. मुंढे यांच्या या इशाऱ्याने जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांची चांगलीच झोप उडाली आहे.
मुंढे यांनी येत्या 31 ऑक्टोबर पर्यंत अहवाल पाठवण्याचे आदेश उपसंचालक लातूर यांना दिले आहेत. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अमोल गीते, यांना सुधारणा करण्याच्या सूचना देखील केल्या आहेत. तसेच उपचारामध्ये हलगर्जीपणा आणि रुग्णांची हेळसांड सहन केली जाणार नाही. असा सज्जड दम तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
बीड जिल्हा रुग्णालयातील अति दक्षता विभाग, प्रसूती वार्ड आणि फिव्हर क्लिनिकला भेट दिली. यावेळी डॉक्टर उपलब्ध नव्हते तर खाजगी डायग्नोसिस सेंटर मधून रिपोर्ट त्यावर उपचार सुरू होते. या संदर्भात विचारणा केली तसेच नवोदित बाळाला पोलिओ डोस दिल्याचं, बेबी कार्ड तयार नव्हते, यावरून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.
दरम्यान, सध्या बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह आढावा बैठक सुरू आहे. या दरम्यान मात्र मुंडे यांनी बेजबाबदार अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी केली आहे. त्याचबरोबर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी खाजगी प्रॅक्टिस करू नये. जर केल्यास डीसमिस करू. असा सज्जड दम देखील यावेळी मुंडे यांनी भरला आहे
काही दिवसांपूर्वी तुकाराम मुंडे यांनी आयुक्त आरोग्य सेवा तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान या पदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी मराठवाडा दौऱ्याला सुरूवात केली. अत्यंत शिस्तप्रिय अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांची ओळख आहे. त्यातच नवीन पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर मुंडे यांनी अचानक रुग्णालयाला भेट देऊन गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ऐन दिवाळीत मुंढे मराठवाडा दौरा करत असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांची झोप उडालीये.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.