बीडचा गुटखा किंग पोलिसांच्या जाळ्यात, अनेक गुटखा तस्करी रॅकेटमध्ये सहभाग

बीड जिल्ह्यासह राज्यात गुटखा बंदी असताना अवैधरित्या गुटका तस्करी करून लोकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या बीडच्या गुटखा किंगला बीड पोलिसांनी अटक केलीये.
बीडचा गुटखा किंग पोलिसांच्या जाळ्यात
बीडचा गुटखा किंग पोलिसांच्या जाळ्यातSaam Tv
Published On

बीड : बीड जिल्ह्यासह राज्यात गुटखा बंदी असताना अवैधरित्या गुटका तस्करी करून लोकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या बीडच्या गुटखा किंगला बीड पोलिसांनी अटक केलीये. महारुद्र उर्फ आबा मुळे असं गुटखा माफियाचं नाव आहे. - Beed Gutka King Aba Mule Arrested By Beed Police

10 - 15 पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

बीडसह मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये जवळपास 10 ते 15 ठिकाणी या गुटखा किंगविरोधात गुन्हे दाखल आहेत. तरी आबा मुळेचा गुटखा तस्करीचा धंदा सुरूच होता. काही दिवसांपूर्वी एसीपी पंकज कुमावत यांनी गुटख्याच्या गोदामावर छापे मारले होते. या कारवाईत जप्त करण्यात आलेला सगळा माल आबा मुळेचा असल्याचं समोर आलं होतं. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. असे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल होते.

बीडचा गुटखा किंग पोलिसांच्या जाळ्यात
Crime Breaking : कुख्यात गुंड सुरेश पुजारीला 10 दिवसांची पोलीस कोठडी!

गुटखा किंगला त्याच्याच घरातून अटक

बीड पोलिसांच्या कागदावर फरार असणाऱ्या आबा मुळेच्या अखेर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्याला बीड शहरातील जालना रोडवर असणाऱ्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आलं आहे. या अटकेमुळे मराठवाड्यातील अनेक गुन्हेगारी प्रकरणं समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच आबा मुळेला सहकार्य करणाऱ्या सत्ताधारी पक्षातील कोणत्या नेत्यांचे हात आहेत, हे देखील पोलीस तपासात निष्पन्न होणार आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com