अबब ऐकावे ते नवलचं! जमिनीच्या वादावरून, थेट 100 भक्तीस्थळांना धमकी ?

धमकीच्या पत्रावरील नाव असणाऱ्या संशयितांचा पोलीस जबाबात खुलासा...
अबब ऐकावे ते नवलचं! जमिनीच्या वादावरून, थेट 100 भक्तीस्थळांना धमकी ?
अबब ऐकावे ते नवलचं! जमिनीच्या वादावरून, थेट 100 भक्तीस्थळांना धमकी ?विनोद जिरे
Published On

बीड - देवस्थानाच्या जमिनी लुटण्याचा प्रकाराने गाजत असणाऱ्या बीड जिल्ह्यात, देवस्थानाला आलेल्या धमकीच्या पत्रानं एकच खळबळ उडाली आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या परळी वैद्यनाथ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या योगेश्वरी देवीच्या विश्वस्तांना धमकीचे पत्र आलेलं आहे.

हे देखील पहा -

50 लाख रुपये द्या अन्यथा, मंदिर आरडीएक्सने उडवीन. अशा अशयाच्या पत्राने खळबळ उडाली आहे. तर या प्रकरणात दोन्ही पत्रावरील नाव असणाऱ्या व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे पत्र जमिनीच्या वादातून पाठवलं असल्याचा जबाब, धमकीच्या पत्रावर नाव असणाऱ्या दोघांनी पोलिसात दिला आहे.

अबब ऐकावे ते नवलचं! जमिनीच्या वादावरून, थेट 100 भक्तीस्थळांना धमकी ?
मुलाने केला वडिलांचा खून; जेवणात उडदाची डाळ– भाकरी केल्याचा राग

एवढेच नाही तर संबंधित आरोपीने हे दोनच नाही तर जवळपास शंभर पत्र असे विविध देवस्थानाला दिले असल्याचा जबाब त्यांनी दिला आहे. दरम्यान जमिनीच्या वादातून प्रतिवादी यांनी हा प्रकार केला असल्याचं दोघांनी सांगितल आहे. त्याचा तपास आम्ही घेत आहोत अशी माहिती पोलीस निरीक्षक उमेश कस्तुरे यांनी दिली आहे. दरम्यान तो प्रतिवादी कोण ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com