Beed Crime News
Beed Crime NewsSaam tv

Beed Crime News: तू काळी आहेस..लग्न करून फसलो; विवाहितेचा मारहाण करून मारले, पोलीस तपासात धक्कादायक माहिती आली समोर

तू काळी आहेस..लग्न करून फसलो; विवाहितेचा मारहाण करून मारले, पोलीस तपासात धक्कादायक माहिती आली समोर
Published on

बीड : तू काळी आहेस, लग्न करून फसलो, तुझ्या घरच्यांनी फसवले.. असे म्हणत बेदम मारहाण करत विवाहितेचा खून करण्यात आला. ही धक्कादायक अन्‌ संतापजनक घटना बीडच्या (Beed News) माजलगावमध्ये घडली. पोलीस तपासात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी पंधरा दिवसानंतर सासरच्या मंडळींवर गुन्हा (Crime News) दाखल झाला आहे. (Breaking Marathi News)

Beed Crime News
Jalgaon News: उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी शिवसैनिक वाजत गाजत मालेगावला रवाना

माजलगाव शहरातील फुलेंनागर भागात राहणाऱ्या रफिक शेख याचा विवाह (Marriage) मयत बानोबी शेख हिच्याशी झाला होता. लग्नानंतर सातत्याने बानोबी हिला पती, सासू व इतर लोक त्रास देत होते. दिवसभर काम करून घेतल्यानंतर देखील तिला जेवायला दिले जात नव्हते. याबाबत मयत बानोबी यांनी अनेकवेळा आपल्या माहेरच्या लोकांना सांगितले होते.

Beed Crime News
Gondia News: केमिकलमध्ये ठेवल्‍यास १० हजाराचे होतात अडीच लाख; फसवणूक करून झाले पसार

नैसर्गिक मृत्‍यूचा केला बनाव

दरम्यान पतीसह सासऱ्याच्या मंडळींनी ६ मार्च रोजी बानोबीला बेदम मारहाण केली. यामध्ये तिचा मृत्यू झाला. मात्र तिचा मृत्यू हा एक नैसर्गिक मृत्यू असल्याचे पती व इतरांनी तिच्या माहेरच्या लोकांना सांगितले. मयत बानोबीचा भाऊ सय्यद तारेख याने संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी शवविच्छेदन केले आणि धक्कादायक माहिती समोर आली. बानोबी हिच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पती रफिक यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com