Beed : अंबाजोगाईत नरेगाच्या रस्ते कामात 17 लाखांचा भ्रष्टाचार!

बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात नरेगाच्या रस्त्याच्या कामात 17 लाखांचा भ्रष्टाचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चुकीचे अंदाजपत्रक तयार करत, मयत व्यक्तींच्या नावे बोगस खाते काढून रक्कम काढण्यात आली आहे.
Beed : अंबाजोगाईत नरेगाच्या रस्ते कामात 17 लाखांचा भ्रष्टाचार
Beed : अंबाजोगाईत नरेगाच्या रस्ते कामात 17 लाखांचा भ्रष्टाचारविनोद जिरे

बीड : बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात नरेगाच्या रस्त्याच्या कामात 17 लाखांचा भ्रष्टाचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चुकीचे अंदाजपत्रक तयार करत, मयत व्यक्तींच्या नावे बोगस खाते काढून रक्कम उचलणाऱ्या, अभियंता, शिक्षकासह पोस्टमनवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा वर्षापूर्वी अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव ते फावडेवाडी दरम्यानच्या रस्ते कामाचे चुकीचे अंदाजपत्रक तयार केले. तसेच, एका शिक्षकाला ठेकेदार दर्शविले. विशेष म्हणजे चक्क मयत व्यक्तींच्या नावे बोगस खाते काढून रक्कम उचलण्यात आली. या रस्त्याचे कोणतेही काम न करता, 17 लाख 8 हजार 468 रुपये उचलून शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपावरून, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचा तत्कालीन शाखा अभियंता एम.एस. चव्हाण, माध्यमिक शाळेतील शिक्षक दिनकर लव्हारे आणि पोस्टमन पंडित ज्ञानोबा पोकळे यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बर्दापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला.

हे देखील पहा :

अंबाजोगाईचे नायब तहसीलदार गणेश सरोदे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय, की मौजे पट्टीवडगाव ते फावडेवाडी रस्ता काम भाग 02 हा 1700 ते 3400 एम या रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरण काम, महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत, सन 2014 ते 15 मध्ये करण्याबाबत अंबाजोगाई तहसीलदारांनी 12 जानेवारी 2015 रोजी कार्यारंभ आदेश दिला होता. सदर कामाची यंत्रणा जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग अंबाजोगाई ही होती. मात्र, येथील तत्कालीन शाखा अभियंता एम.एस. चव्हाण याने, सदर रस्त्याच्या कामाचे चुकीचे अंदाजपत्रक तयार केले. तसेच, रस्त्याचे कोणतेही काम न करता त्याबाबत मोजमाप पुस्तिकेत नोंदी घेतल्या व त्याबाबतचे बोगस देयके तयार करून शासनाची फसवणूक केली.

Beed : अंबाजोगाईत नरेगाच्या रस्ते कामात 17 लाखांचा भ्रष्टाचार
Akola : गरिबांचा घास काळ्या बाजारात विक्रीसाठी; तब्बल सहाशे क्विंटल गहू जप्त!
Beed : अंबाजोगाईत नरेगाच्या रस्ते कामात 17 लाखांचा भ्रष्टाचार
Breaking Satara : विवाहितेच्या आत्महत्येनंतर माहेरच्या मंडळींनी सासरच्या दारात केले अंत्यसंस्कार

तर, या कामासाठी परळी तालुक्यातील लाडझरी येथील अनुदानित शिक्षण संस्थेतील माध्यमिक शिक्षक दिनकर लव्हारे यांस ठेकेदार दर्शवून शासनाची आर्थिक फसवणूक केली. तसेच, पट्टीवडगाव येथील पोस्टमन पंडित ज्ञानोबा पोकळे याने अभियंता चव्हाण आणि शिक्षक दिनकर लव्हारे या दोघांसोबत संगनमत करून मयत आणि इतर व्यक्तीच्या नावे बोगस खाते काढले व त्यांच्या नावे जमा झालेली अकुशल मजुरांची देयके परस्पर काढून घेत, शासनाची आर्थिक फसवणूक केली. हा सर्व भ्रष्टाचार 17 लाख 8 हजार 468 रुपयांचा असून हि संपूर्ण रक्कम उचलूनही रस्त्याचे कोणतेच काम झाले नाही असं म्हटलंय. दरम्यान याप्रकरणी सरोदे यांच्या फिर्यादीवरून तिन्ही आरोपींवर कलम 420, 467, 468, 471, 409, 34 अन्वये बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर सध्या पोलीस तपास सुरु असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नसल्याची माहिती तपासी अधिकारी पीएसआय खरात यांनी दिली.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com