Beed Crime: धक्कादायक! 12 लाखांसाठी मजूर पुरावठादार अधिकाऱ्याचं अपहरण करून ठेवलं डांबून

पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी
Beed Crime: धक्कादायक! 12 लाखांसाठी मजूर पुरावठादार अधिकाऱ्याचं अपहरण करून ठेवलं डांबून
Beed Crime: धक्कादायक! 12 लाखांसाठी मजूर पुरावठादार अधिकाऱ्याचं अपहरण करून ठेवलं डांबूनविनोद जिरे
Published On

बीड: बीडच्या केज तालुक्यात पैशाच्या मागणीवरून खळबळजनक प्रकार समोर आला आहे. 12 लाखांची मागणी करत, साखर कारखाण्याच्या मजूर पुरावठादार अधिकाऱ्याचे अपहरण करून, डांबून ठेवण्यात आले आहे. सुधाकर उर्फ सुदाम चाळक रा. लव्हुरी ता. केज असे अपहरण झालेल्या मजूर पुरावठादार अधिकाऱ्याचे नाव आहे. (Beed Abduction labor supply officer Rs 12 lakh)

हे देखील पहा-

सुधाकर चाळक हे उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यात असणाऱ्या, महालक्ष्मी साखर कारखाना (Sugar factory) येथे मजूर पुरवठा अधिकारी म्हणून काम पाहतात. त्यांचे 16 फेब्रुवारी रोजी बीडच्या (Beed ) वडवणी शहरातून काही अज्ञात लोकांनी अपहरण (Abduction) केले होते. मात्र, अनेक दिवसांपासून घरी न आल्याने, 25 फेब्रुवारी रोजी त्यांच्या नातेवाईकांनी चाळक बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. 27 फेब्रुवारी रोजी त्यांचा भाऊ आणि मुलं यांना, चाळक यांच्या फोनवरून अज्ञात लोकांनी फोन केला होता. अपहरणकर्ते हे सुधाकर चाळक यांच्या सुटकेसाठी 12 लाख रुपयांची मागणी करत आहेत.

तसेच त्यांना अमानुष मारहाण (Beating) करत असल्याचा कॉल रेकॉर्डिंगचा आवाज ऐकू येत असून सुधाकर चाळक हे मारहाणीमुळे विह्वलत असल्याचे त्या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येत आहे. अपहरणकर्त्याला त्यांचा मुलगा हा मारहाण न करण्याची विंनती देखील करत आहे. तरीदेखील ते अमानुष आणि बेदम मारहाण करीत आहेत. नेमकं काय आहे.

Beed Crime: धक्कादायक! 12 लाखांसाठी मजूर पुरावठादार अधिकाऱ्याचं अपहरण करून ठेवलं डांबून
दुर्दैवी! शौचालयाची टाकी साफ करताना पडून 4 तरुणांचा मृत्यू, पुण्यातील धक्कादायक घटना (पहा Video)

अपहरणकर्ते हे हिंदी भाषेत बोलत शिवीगाळ करत आहेत. सुटकेसाठी ते कर्नाटक येथील शंकेश्वर साखर कारखान्यावर पैसे घेऊन येण्याची मागणी करत आहेत. जर पैसे आणून दिले नाहीत तर जीवे मारू, अशी धमकी देखील फोनवरून देत आहेत. असे अपहरण झालेल्या सुधाकर चाळक यांचा मुलगा अक्षय चाळक याने सांगितले आहे. दरम्यान हा प्रकार पैशाच्या देवाण घेवाणीवरून झाल्याचा अंदाज देखील ऑडिओ क्लिपमधील आवाजामुळे व्यक्त केला जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com