Nandurbar : क्रूरतेचा कळस ! मूल होत नसल्याने सुनेला अमानुष मारहाण; धक्कादायक घटनेनं नंदुरबार हादरलं

मूल होत नाही म्हणून सुनेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली आहे.
 Nandurbar
Nandurbar Saam Tv

सागर निकवाडे

Nandurbar News: आज देशात महिला विविध क्षेत्रात प्रगती करत आहेत. मात्र अनेक मागास भागांमध्ये महिलांवरील अन्याय अद्याप थांबले नाहीत. नंदुरबारमध्ये काळीज सुन्न करणारी अशीच एक भयानक घटना घडली आहे. यामध्ये मूल होत नाही म्हणून सुनेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली आहे. पुरोगामी महाराष्ट्रात असे प्रकार घडत असल्याने ही एक लाजिरवाणी बाब आहे. (Latest Nandurbar News)

नंदुरबार जिल्ह्यातील खडवड गावात ही थरारक घटना घडली आहे. आशाबाई असं जखमी महिलेचं नाव आहे. मूल होतं नसल्याच्या कारणावरून सासरच्या लोकांनी तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. यावेळी त्यांनी तिला लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसचे लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे.

 Nandurbar
Nandurbar News: नंदुरबार जिल्‍ह्यात अवकाळी पाऊस; खांडबारा आठवडे बाजारात धावपळ

सासरच्या मंडळींकडून सततच्या या जीवघेण्या त्रासाला कंटाळून अखेर महिलेने पोलीस स्टेशन गाठले आणि सासरच्या मंडळींची तक्रार नोंदवली आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सासू,सासरा आणि दिर यांच्याविरुद्ध धडगाव पोलिस ठाण्यात कलम 324 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून पुढील उपचारासाठी नंदूरबार जिल्हा रुग्णालय दाखल करण्यात आलं आहे.

 Nandurbar
Yavatmal : ब्रेकअप झालं म्हणून प्रेयसीचे पर्सनल फोटो केले व्हायरल; भावाला व्हिडिओ पाठणाऱ्या नराधमाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

क्रूरतेचा कळस गाठणारी अशीच आणखीन एक घटना यवतमाळ येथे देखील उघडकीस आली आहे. तीन वर्षांच्या प्रेमाला तरुणाने एका क्षणात संपवलं आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की, हे दोघेही गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांवर प्रेम करत होते. काही दिवसांपूर्वी त्या दोघांमध्ये जोरदार भांडण होऊन ब्रेकअप झालं. यामुळे प्रेयसीने त्याच्याबरोबर बोलणं बंद केलं आणि ती स्वत:च्या आयुष्यात व्यस्त झाली. याचा प्रियकराला राग आला आणि त्याने प्रेयसीचे पर्सनल फोटो सोशल मीडियावर शेअर करत पीडितेच्या भावाला पाठवले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com