Nagpur: 'बार्टी' मध्ये प्रशिक्षणाच्या नावाने कोट्यवधींचा गैरव्यवहार

हे कंत्राट देताना कुठलीही निविदा प्रक्रिया राबविली नाही. एका वर्षांसाठी देण्यात येणारे हे कंत्राट यावेळी पाच वर्षांसाठी देण्यात आले. पूर्वी असलेल्या 43 संस्थांपैकी मार्जितल्या 30 संस्थांना कंत्राट देण्यात आले
Arogya Bharati Exam Breaking | आरोग्य विभागाच्या गट क परीक्षेतही घोळ ?; (पहा व्हिडीओ)
Arogya Bharati Exam Breaking | आरोग्य विभागाच्या गट क परीक्षेतही घोळ ?; (पहा व्हिडीओ)SaamTV
Published On

नागपूर- 'बार्टी' (Barty) अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेमध्ये स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या नावावर कोट्यवधींचा गैरव्यवहार झाला आहे. बार्टीने राज्यात 30 ठिकाणी बँक, रेल्वे, एलआयसी स्पर्धा परीक्षा (Competitive Exam) प्रशिक्षण केंद्रांसाठी 45 कोटी रुपयांचे कंत्राट दिले. मात्र, हे कंत्राट देताना कुठलीही निविदा प्रक्रिया राबविली नाही. एका वर्षांसाठी देण्यात येणारे हे कंत्राट यावेळी पाच वर्षांसाठी देण्यात आले. पूर्वी असलेल्या 43 संस्थांपैकी मार्जितल्या 30 संस्थांना कंत्राट देण्यात आले, तसेच एका संस्थेला एकापेक्षा अधिक ठिकाणी प्रशिक्षणचं काम देण्यात आलं आहे. (Nagpur Latest News)

हे देखील पहा -

माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीत या बाबी उघड झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी कायम चणचण असल्याची ओरड करणाऱ्या सामाजिक न्याय विभागानं 45 कोटी रुपये मंजूर करून 40 टक्के निधी संस्थाना देऊन टाकले. त्यामुळं सामाजिक न्याय विभागातील बड्या अधिकाऱ्यांनी मर्जितल्या संस्था चालकांना फायदा पोहचविण्यासाठी हा खटाटोप केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com