Baramati News : गिरवीत टाकण्यात आलेल्या बंधाऱ्याला भगदाड; गणेशमार्गे होणारी वाहतूक बंद

Baramati News : बारामती जिल्ह्यातील वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने सध्या वीर धरणातून नीरा नदी पात्रात गेल्या काही दिवसापासून पाण्याचा मोठा विसर्ग करण्यात येत आहे
Baramati News
Baramati NewsSaam tv
Published On

बारामती : बारामतीमध्ये देखील जोरदार पाऊस सुरु असून वीर धरण भरले आहे. यामुळे पाण्याचा विसर्ग होत असून नीरा नदीवर इंदापूरातील गिरवीत टाकण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या भराव्याला पुन्हा एकदा भगदाड पडले आहे. तिसऱ्यांदा हे भगदाड पडले असून गिरवी वरुन गणेशगाव मार्गे होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. 

Baramati News
Bhiwandi News : भिवंडीत अंमली पदार्थांची विक्री; फिल्मी स्टाईलने सापळा रचून महिला ताब्यात, २४ लाखांहून अधिक किंमतीचे चरस जप्त

बारामती (Baramati) जिल्ह्यातील वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने सध्या वीर धरणातून नीरा नदी (Nira River) पात्रात गेल्या काही दिवसापासून पाण्याचा मोठा विसर्ग करण्यात येत आहे. परिणामी निरा नदीला पूरजन्य परिस्थिती असून इंदापूर तालुक्यातील गिरवी येथे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याला मोठं भगदाड पडलंय. नीरा नदीवरील गिरवी येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा भरावा या पुराच्या पाण्याने फुटल्याने पाणी बंधाऱ्याच्या बाजूने वाहू लागले आहे. 

Baramati News
Dhule News : आरक्षित जमिनीवर अतिक्रमण; मेंढपाळ बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या

गिरवीतील या बंधाऱ्याला भगदाड पडण्याची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वी देखील दोन वेळा अशा घटना घडल्या आहेत. बंधाऱयाला भगदाड पडण्याची आता तिसरी वेळ आहे. भगदाड पडल्याने इंदापूर तालुक्यातील गिरवी गावातून माळशिरस तालुक्यातील गणेशगाव कडे होणारी वाहतूक बंद पडली आहे. आता नदीला असलेला पूर ओसरल्यानंतरच बंधाऱ्याला पडलेले भगदाड भरण्याचे काम होऊ शकणार आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com