Baramati: बारामतीत कृषी विज्ञान केंद्राची कमाल; AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घेतले ऊसाचे यशस्वी उत्पादन

Baramati Agriculture News: बारामती कृषी विज्ञान केंद्राने एक यशस्वी प्रयोग केला आहे. AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऊसाचे उत्पादन घेतले आहे.
Baramati
BaramatiSaam Tv
Published On

बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या ( ए आय ) तंत्रज्ञानावर कृषी क्षेत्रात वापर करताना उसाच्या पिकाची यशस्वी लागवड केली आहे.यावेळी भविष्यातील शेती कशी असेल याला डोळ्यासमोर ठेवून आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून या शेतीचा प्रयोग एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट,कृषी विज्ञान केंद्र,ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी तसेच मायक्रोसॉफ्ट यांच्या वतीने यशस्वीपणे राबवला आहे.राज्यातील 1000 हजार शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प्रायोगिक तक्तावर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून हे पीक घेण्यात आले आहे. याची दखल देखील मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्य नडेला यांनी घेतली असून त्यांनी या प्रयोगाचे कौतुक केले आहे..

यावेळी भाजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पारंपारिक शेती व शेतीतील परिपूर्ण माहितीचा अभाव यामुळे उत्पादन खर्च वाढला व उत्पादन घटले त्यामुळे आजमितीस प्रति एकर उसाचे सरासरी उत्पादन 35 ते 40 त्यांना पर्यंत घसरले आहे त्यामुळे पर्यायाने ऊस शेती परवडत नाही.व यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होताना दिसत असल्याचे म्हटले आहे.मात्र हा प्रयोग कृषी अर्थकारणाला कलाटणी देणारा प्रकल्प होणार असून या तंत्रज्ञानाचा वापर ऊस उत्पादकांकडून प्रभावीपणे झाल्यास राज्यात 15 हजार तर देश स्तरावर 35 हजार कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न शेतकऱ्यांना मिळेल. असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले..

Baramati
Success Story: अभ्यासासोबत गुरं चरायली घेऊन जायचा, दुसऱ्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; IPS प्रेमसुख डेलू यांचा प्रेरणादायी प्रवास

ए आय तंत्रज्ञानावर ऊस लागवडीपासून ते आतापर्यंत जे काही वापरले आहे.. ते सगळं हे आहे AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वापरलेल आहे.. पारंपारिक शेती करत असताना शेतकऱ्यांकडे काही मर्यादा असतात..परंतु या तंत्रज्ञानामुळे रोजच्या रोज आपल्या पिकांमध्ये होणारे बदल आपल्याला या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोबाईलद्वारे समजत असतात..

उसामध्ये भरपूर प्रमाणात कीड आणि रोगाचा वावर झालेला आहे.. काही ठिकाणी या किडीमुळे हजारो एकर ऊसाचे क्षेत्र बाधित झालेला आहे. हे रोखायचा असेल तर रोग येण्यापूर्वी आपल्याला दक्ष राहण्याचं हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना सांगते.. यातील वेदर स्टेशन द्वारे हवामानाच्या अभ्यासाचे संकलन करून शेतकऱ्यांना मोबाईल द्वारे योग्य ती माहिती दिली जाते,असं कृषीतज्ञ तुषार जाधव यांनी सांगितलं आहे.

एक हजार शेतकरी आपण या प्रकल्पाद्वारे निवडले आहेत,आणि जवळपास 250 लोकांच्या प्रक्षेत्रावर आपण हे तंत्रज्ञान डेव्हलप केलेला आहे.. शेतकऱ्यांना सगळ्यात महत्त्वाचा अनुभव येतोय तो पाण्याचे नियोजन.. वेदर स्टेशन मधील सेन्सरद्वारे पिकाला कधी पाणी द्यायचं..पाण्याची पातळी मातीमध्ये किती आहे हे सगळं नियोजन सेंसरच्या मदतीने केल जातो..

ऑक्सफर्ड आणि मायक्रोसॉफ्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने हा प्रयोग सुरू केलेला आहे.गेल्या शंभर वर्षाचा उसाचा डेटा माहीत असल्याने आपण हे पीक घेतले आहे.उसासाठी काय पोषक वातावरण आहे हे आपल्याला माहीत असतं.ऊस महाराष्ट्रातील महत्त्वाच पीक आहे.ही टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांना परवडेल की नाही हे पाहावे लागेल.आणि त्यामुळे साहजिकच साखर कारखाने इंडस्ट्री म्हणून शेतकऱ्याला सपोर्ट करू शकतील म्हणून हा प्रयोग केला आहे.आणि कोणत्या प्रजातीचा ऊस या तंत्रज्ञानाला जास्तीत जास्त प्रतिसाद देतो हे पाहून हे तंत्रज्ञान विकसित करावे लागेल..

Baramati
Success Story : स्वप्नासाठी घर विकलं, आईच्या नावाने कंपनी उभारली, आज १००० कोटींचे साम्राज्य

या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादन कमी खर्च आणि शाश्वत शेतीचा मार्ग दाखवला जात असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हवा पाऊस तापमान सूर्यप्रकाश जमिनीतील ओलावा पोषणमूल्य आधीची मोजणी करणारे सेंसर बसवले असून,या माध्यमातून डेटा सॅटॅलाइट ड्रोन इमेजरी आणि ऐतिहासिक माहितीच्या आधारे शेतकऱ्याला मोबाईल ॲपद्वारे माहिती मिळते.यामुळे यायच्या साह्याने ऊस उत्पादनास 30 टक्के अधिक वजनाचे व 20 टक्के जास्त साखरयुक्त ऊस मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.यासाठी पाणी व कमी खत लागले आणि पीक तयार होण्याचा कालावधी देखील 18 महिन्यांवरून बारा महिने झाले असल्याचे देखील भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली..

Baramati
Success Story: ९ ते ५ नोकरी, रात्रभर अभ्यास; आधी BPSC अन् नंतर UPSC क्रॅक; IAS श्वेता भारती यांची यशोगाथा वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com