Nagpur: नागपूरकरांनो सावधान, 31 डिसेंबरची पार्टी आयोजित केल्यास 5 वर्षांची शिक्षा

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि ओमिक्रॉनचं संकट पाहाता नागपुरात 31 डिसेंबरच्या पार्ट्यांवर बंदी घालण्यात आलीये.
Nagpur News Year Celebration
Nagpur News Year CelebrationSaam Tv
Published On

नागपूर : कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि ओमिक्रॉनचं संकट पाहाता नागपुरात 31 डिसेंबरच्या पार्ट्यांवर बंदी घालण्यात आलीये. त्यामुळं पार्ट्या आणि विनापरवाना मद्य सेवन करणाऱ्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा वॅाच असणार आहे. (Ban on parties on December 31 in Nagpur)

यासाठी विभागानं आठ भरारी पथकाची नियुक्ती केलीये. यातील तीन पथकं शहरात आणि तीन पथकं ग्रामीण भागात तैनात असणार आहेत. तर दोन पथक मुख्यालयात असतील. शहरातील अवैध मद्यविक्रीवर या पथकाची करडी नजर असणार आहे.

हेही वाचा -

Nagpur News Year Celebration
Lockdown Update | राज्यात कडक निर्बंध लागू, पाहा नियम काय?

नागपूर शहरात 31 डिसेंबरच्या पार्ट्यांवर बंदी घालण्यात आलीये. त्यामुळं जर कुणी पार्टी आयोजित केली तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. पार्टी आयोजित केल्यास 3 ते 5 वर्षांची शिक्षा आणि 50 हजारांपर्यंत दंड वसूल केला जाणार आहे.

5 रुपयांत परवाना घ्या आणि दारु प्या

नागपुरात दारु पिण्यासाठी आता परवाना लागणार आहे. 5 रुपयांत एक दिवसाचा परवाना उत्पादन शुल्क विभागाकडून दिला जाणार आहे. यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन व्यवस्था करण्यात आलीये. मद्याच्या दुकानात ऑफलाईन परवाना मिळेल.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com