Satara News: साताऱ्यात लोकनेते बाळासाहेब देसाई या नावाने आयलँड विकसित होणार, राज्य सरकारने निधीस दिली मान्यता

Balasaheb Desai Island: सातारा शहरातील नगर परिषद हद्दीतील पोवई नाका परिसरात लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांच्या स्मरणार्थ आयलँड विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Balasaheb Desai Island
Balasaheb Desai IslandSaam Tv
Published On

Balasaheb Desai Island:

सातारा शहरातील नगर परिषद हद्दीतील पोवई नाका परिसरात लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांच्या स्मरणार्थ आयलँड विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याकरिता १ कोटी ३७ लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यास गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मान्यता दिली आहे.

बुधवारी, २१ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेल्या सूचनांनुसार अवघ्या एक दिवसात जिल्हा प्रशासनाने आयलँड प्रस्तावाची कार्यवाही पूर्ण केली. गुरुवारी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी निधी उपलब्ध करून दिल्याने आयलँड विकसित होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Balasaheb Desai Island
Ashok Saraf: 'रसिक प्रेक्षकांचे प्रेम कायम हृदयात राहील', महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर अशोक सराफांनी व्यक्त केल्या भावना

साताऱ्याचे सुपुत्र लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मरणार्थ पोवई नाका येथे आयलँड विकसित करण्याची मागणी साताऱ्यातील नागरिकांकडून गेल्या काही काळापासून होत होती. त्या अनुषंगाने पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बुधवारी सह्याद्री अतिथीगृह येथे जिल्हा प्रशासन व संबंधित विभागांची आढावा बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने आयलँड प्रस्तावाची कार्यवाही अवघ्या एका दिवसात पूर्ण केली. (Latest Marathi News)

गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या विशेष बैठकीत सदर प्रस्ताव मांडण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी पोवई नाका येथे आयलँड होण्याच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका घेत त्याकरिता निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली.

Balasaheb Desai Island
Sharad Pawar Group Symbol New Symbol: शरद पवार गटाचं नवं चिन्ह 'तुतारी', निवडणूक आयोगाची घोषणा

त्यानुसार नगर विकास विभागाच्या निधीतून १ कोटी ३७ लाख रुपये निधी आयलँड विकसित करण्यास उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मरणार्थ शहराच्या सौंदर्यात भर घालणारे ट्रॅफिक आयलँड पोवई नाका येथे लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सकारात्मक सहकार्यामुळे आयलँड विकसित होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने सातारकर नागरिकांमध्ये आनंदाची भावना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com