चेतन इंगळे
नालासोपारा - नालासोपाऱ्यातील वसई-विरार महानगरपालिकेच्या समेळपाडा स्मशानभूमीत प्रेताला अग्नी देण्याच्या ठिकाणी (सरणावर) छप्पर नसल्याने भर पावसात प्रेतावर पत्रे पकडून अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून मनसेने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. Bad condition of Samelpada cemetery in Nalasopara MNS warns of agitation
हे देखील पहा -
नालासोपारा येथील समेळपाडा वैकुंठधाम स्मशानभूमीत 1 नोव्हेंबर 2020 पासून 1 जून 2021 पर्यँत 866 मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून यात 324 कोविडमुळे मृत पावलेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आहेत. या ठिकाणी 2012 मध्ये गॅस दाहिनी बसवण्यात आली होती. मात्र त्याचा वापर नसल्याने ती अडगळीत पडून लाखो रुपयांचा चुराडा झाला आहे.
आता पुन्हा एकदा नवीन दाहिनी बसवण्याचे काम सुरू असून ती दाहिनी पावसात भिजत ठेवण्यात आली आहे. येथील लाकडे ठेवण्याच्या रूम ला बाहेरून मुलामा देण्याचे काम सुरू आहे.10 वर्षांपूर्वी बांधलेली इमारत धोकादायक बनली असून त्याची चौकशी करण्याची मागणी मनसेने केली आहे.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.