Navratri: नवरात्रीत भगरीचे विघ्न; भगर खाल्‍ल्‍याने पाचशेहून अधिक नागरिकांना विषबाधा

नवरात्रीत भगरीचे विघ्न; भगर खाल्‍ल्‍याने पाचशेहून अधिक नागरिकांना विषबाधा
Aurangabad News
Aurangabad NewsSaam tv
Published On

नवनीत तापडिया

औरंगाबाद : नवरात्रोत्सवानिमित्त उपवासासाठी खरेदी केलेल्या भगर व भगरीच्‍या पिठातून विषबाधेचे सत्र सुरूच आहे. औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात 500 पेक्षा अधिक नागरिकांना विषबाधा झाली असल्याचे समोर आले आहे. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून अन्न व औषध प्रशासनासह पोलीस (Police) प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. वैजापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. (Aurangabad Today News)

Aurangabad News
Beed: नवरात्र महोत्सवात अश्लील नृत्य; पोलिसांना करावा लागला लाठी मार

औरंगाबाद (Aurangabad News) जिल्ह्यात भगर खाल्ल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांना विषबाधा झाली आहे. ज्यात सर्वाधिक संख्या औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील आहे. आरोग्य विभागाने (Health Department) दिलेल्या माहितीनुसार एकट्या वैजापूर तालुक्यात 118 जणांना विषबाधा झाली आहे. तर कन्नड, गंगापूर तालुक्यात देखील अनेकांना भगरीतून विषबाधा झाली आहे. सुरवातीला औरंगाबादच्या लासूर स्टेशन येथील 13 नागरिकांना विषबाधा झाली होती. त्यानंतर त्याच गावात आणखी 12 जणांना विषबाधा झाली. वैजापूर तालुक्यातील 118 जणांना विषबाधा झाली तर कन्नड तालुक्यातील 12 जणांना विषबाधा झाली आहे.

खासगी रुग्णालय फुल्ल

या विषबाधेमुळे ग्रामीण भागातील शासकीय तसेच अनेक खासगी रुग्णालये फुल्ल झाली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी फिरस्ती विक्रेत्यांकडून भगरचे पीठ घेतल्याने अशा घटना घडल्याची शक्यता अन्न व औषध प्रशासनाने वर्तवली आहे. तसेच नागरिकांनी कुठलेही अन्न पदार्थ विकत घेताना ते पॅकबंद असलेले पदार्थ परवानाधारक विक्रेत्यांकडून विकत घ्यावे; असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत

नवरात्र सुरू होताच झालेल्या या घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. या सर्व प्रकारामुळे अन्न व औषध प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले असून, त्यांनी पदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत आणले. यामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर नक्कीच कारवाई केली जाणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. यावर आता अन्न व औषध प्रशासन काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com