Aurangabad News : औरंगाबाद बनलंय दुचाकी चोरीचे हॉटस्पॉट; गेल्या वर्षी 'इतक्या' वाहनांची चोरी

अवैद्य पार्किंग आणि जबाबदारी झटकणाऱ्या पार्किंग चालवणाऱ्यांवर कारवाई किंवा चर्चा करून मार्ग काढू, पोलीस आयुक्तांची माहिती
Aurangabad News
Aurangabad NewsSaam Tv

नवनीत तापडिया

Aurangabad News : औरंगाबाद शहरात दुचाकी चोरांनी धुमाकूळ घातल्यामुळे 2022 या वर्षभरात तब्बल 854 दुचाकींसह सर्व प्रकारचे 918 वाहने चोरीला गेली. म्हणजेच दर दिवसाला शहरातून सरासरी तीन वाहने चोरीला जात आहेत. पोलिसांनी केलेल्या विश्लेषणा नुसार शहरातील एमजीएम संस्था प्रोजन मॉल, घाटी रुग्णालय, रेल्वे स्थानक, बस स्थानक आणि कंपन्यांच्या बाहेर रस्त्यावर पार्क केलेली वाहने चोरीला जात आहेत. यामुळे ही ठिकाणे दुचाकी चोरींचे हॉटस्पॉट बनले आहेत.

Aurangabad News
Teacher Beaten Student : भयंकर! विद्यार्थ्याचे केस खेचले, लाथाबुक्क्यांनी मारले; शिक्षकांच्या क्रूर शिक्षेचा Video Viral

औरंगाबाद (Aurangabad) शहरात 2022 मध्ये सर्व प्रकारची 918 वाहने चोरीला गेली. यातील 854 या दुचाकी आहेत दुचाकी एकदा लंपास केल्यानंतर पुन्हा शोध घेणे कठीण होते. चोरलेली दुचाकी ग्रामीण भागात विकली जाते किंवा तोडफोड करून सुटे भाग विकण्यात येतात.

यामुळे 918 वाहन चोरींपैकी केवळ 293 वाहने पुन्हा मिळवण्यात पोलिसांना यश आलंय. पोलीस आपल्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत मात्र नागरिकांनी देखील सतर्क राहून पोलिसांची मदत केली तर मोटर सायकल चोरीला आळा बसेल अशी माहिती पोलिसांनी (Police) दिली.

चोरीचा प्रमाण आठवड्यातील सात वारांमध्ये रविवारी सर्वाधिक आहे. मागील वर्षभरात रविवारी 135 दुचाकी चोरीला गेल्यात तर सोमवार 132 मंगळवार 113, बुधवार 116, गुरुवार 119, शुक्रवारी 123 आणि शनिवारी 116 दुचाकी चोरीला गेले आहेत. तसेच दुचाकी चोरांनी रात्री सर्वाधिक दुचाकींची चोरी केलीये.

Aurangabad News
Maharashtra Politics : PM मोदींच्या मुंबई दौऱ्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, देशात हुकूमशाही...

मागील वर्षभरात सकाळी सहा ते सायंकाळी सहा या वेळेत 389 दुचाकींची चोरी झाली तर सायंकाळी सहा ते सकाळी सहा या वेळेत तब्बल 465 दुचाकी चोरून नेण्यात आल्यात. शहरातील एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वर्षभरात सर्वाधिक 225 दुचाकींची चोरी झाली आहे. त्यानंतर सिडको एमआयडीसी, सिडको, पुंडलिक नगर, जवाहर नगर या पोलीस ठाण्यांचा क्रमांक लागतो. मागील वर्षी सर्वाधिक 244 दुचाकी या शहरात रस्त्यावर पार्क केलेल्या चोरी गेल्या आहेत.

या सर्व वाहन चोरीवर पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी सांगितले की, पोलीस पोलिसांच्या पद्धतीने काम करत असून, नागरिकांनी मोटरसायकलला 400 ते 500 रुपयांमध्ये मिळणारे जीपीएस सिस्टम सुद्धा लावावी आणि एक्स्ट्रा लोक सुद्धा लावावेत त्याने मोटरसायकल शोधायला अजून सोपे जाईल आणि ती मोटरसायकल तात्काळ मिळू शकते.

एवढेच नाही तर पार्किंग घेतानी पार्किंग चालवणारे पैसे घेतात मात्र मोटरसायकलची गॅरंटी घेत नाही त्यांच्यासोबत सुद्धा आम्ही लवकरच चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावू. आता पोलीस या मोटरसायकल चोरी थांबू शकतात का? हे येणाऱ्या काळात पहाव लागेल.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com