औरंगाबाद : औरंगाबादमधून (Aurangabad) धक्कादायक बातमी समोर येत आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये नशेच्या (Addiction) बटन गोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. शहरातील तरुणाई बटन गोळ्याच्या आहारी गेल्याचं दररोज दिसत असताना बटन गोळ्यांचा धंदा तेजीत असल्याचं समोर आलं आहे. औरंगाबादमध्ये पोलिसांनी (Police) तब्बल 600 बटन गोळ्या पकडल्यानं खळबळ उडाली आहे. औरंबादमधील तरुणाई (Youth) नशेच्या आहारी गेल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. ( Aurangabad Crime News In Marathi )
औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली आहे. यामुळे औरंगाबाद शहर हे गुन्हेगारीचे माहेरघर बनत चालले असल्याचे दिसून येत आहे. महिनाभरात नशेखोरांकडून हत्येच्या घटना घडल्या आहेत. वाढत्या गुन्हेगारीचे मुख्य कारण म्हणजे तरुणाई मोठ्या प्रमाणावर नशेच्या आहारी जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात सरासरी दिवसाआड पोलीसांकडून नशेच्या गोळ्या जप्त करण्यात येत आहे. यामध्ये बटन नावाच्या नशेच्या गोळ्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. आता शहरातील शहनुरमिया दर्गा परीसरात एका इसमाकडून 600 नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी दोघांना पोलीसांनी अटक केली आहे.
गेल्या काही आठवड्यातही आमखास मैदान परिसरात अशाच प्रकारे नशेच्या गोळ्या पोलीसांनी जप्त केल्या होत्या. शहरात नशेखोरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले असल्याने शहराचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी 'एनडीपीएस' पथकाची स्थापना केली, परंतु यानंतरही बेकायदेशीरपणे नशेच्या गोळ्या शहरात मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. यामुळे शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर असल्याचे दिसून येत आहे.
पोलिसांकडून कारवाई करूनही शहरात मोठ्या प्रमाणावर नशेच्या गोळ्या अनाधिकृतपणे बाळगत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरात आता मोठ्या प्रमाणावर नशेखोर वाढले असून यामुळे गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान औरंगाबाद शहर पोलीसांसमोर निर्माण झाले आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.