Crime News
Crime Newssaam tv

Aurangabad Crime News : प्रेमविवाहानंतर त्रास देणाऱ्या पतीचा काढला पत्नीने काटा

औरंगाबाद शहरातील धक्कादायक घटना
Published on

नवनीत तापडिया

Aurangabad Crime News : औरंगाबाद (Aurangabad) शहरातील वाल्मी परिसरातील सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गालगत 27 ऑक्टोबर रोजी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. त्या व्यक्तीचा खून झाल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झाले. यानंतर शहर पोलीसांनी (Police) तपासाची चक्रे फिरवून संशयित पत्नीला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर तिने मित्राच्या सहाय्याने खून केल्याची कबुली दिली. (Aurangabad Latest Crime News)

Crime News
Morbi Cable Bridge Collapses: मोरबी पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा 141 वर; प्रशासनाने दिले चौकशीचे आदेश

विजय पाटणी असे मृताचे नाव असून, मृताची पत्नी सारिका व सागर अशी आरोपींची नावे आहेत. बारा वर्षांपूर्वी सारिका आणि विजयने प्रेम विवाह केला होता. कौटुंबिक वादामुळे पती, पत्नी विभक्त राहू लागले खरे, मात्र, तरीही पती त्रास देत होता. मागील काही दिवसांपासून विजय हा पत्नीकडे सतत दारू पिऊन त्रास देत होता.या त्रासाला कंटाळून पत्नीने पतीला संपवण्याचा निर्णय घेतला त्यासाठी सागरची मदत घेतली. (Aurangabad News Today)

खून केल्यानंतर दहा दिवसांनी हा प्रकार समोर आला. याप्रकरणी सातारा पोलिसांनी एकास ताब्यात घेतले असून पत्नीसह प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने खुनाची कबुली दिली आहे.

घटना नेमकी कशी घडली?

१८ ऑक्टोंबर रोजी पत्नी पतीला फिरायला जाऊ म्हणत गळ घातली. तोही तयार झाला. फिरायला जाण्याआधीच पत्नी सारिकाने धारदार चाकू आणि डोळ्यात मारायला स्प्रे खरेदी केला होता. त्यानंतर पत्नीने विजयला जास्तीची दारू पाजली. रात्री साडेदहा वाजेनंतर ते दोघे नवीन धुळे-सोलापूर महामार्गावर वाल्मीजवळील उड्डाणपुलाजवळ पोहोचले असता भररस्त्यावर सारिकाने विजयच्या डोळ्यात स्प्रे मारला आणि चाकूने सपासप त्याच्या पोटात वार केले. यात विजय रक्तबंबाळ होऊन रस्त्यावर कोसळला.

मित्रानेने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत करायला नकार दिला असता सारिकाने त्याला तुझ्यासोबतचे फोटो पोलिसांनी दाखवून खुनाच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. त्यामुळे सागरने तिला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मद मदत केली.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com