Court: सरकारी वकीलांची मागणी अमान्य; इतके दिवस पाेलिसांनी काय चाैकशी केली : न्यायालय

डीएमआयसी समृद्धीसह धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गासाठी बिडकीन, चिकलठाणा, करमाडसह कन्नड भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झालेल्या आहेत. शासनाने या शेतकऱ्यांना कोट्यवधींचा मावेजा दिला आहे. अशाच भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांना गाठून मास्टरमाइंड सचिन ऊर्फ संतोष राठोड याच्यासह त्याच्या टोळक्याने २५ ते ३० टक्के व्याजाचे आमिष दाखवून शेकडो कोटी रुपये उकळले. त्यातून गुन्हा नाेंद झाला आहे.
Court
Court Saam Tv
Published On

- अविनाश कानडजे

औरंगाबाद : मराठवाड्यासह मराठवाड्यात गाजत असलेल्या ३०-३० घोटाळ्यातील मुख्य आरोपी संतोष राठोड (santosh rathod) याला न्यायालयाने आज (साेमवार) न्यायालयीन कोठडी (magistrate custody) सुनावली आहे. संतोष राठोड याची आज पोलीस कोठडी (police custody) संपत होती.

या प्रकरणी आज झालेल्या सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांनी संताेष राठाेडला पुन्हा पाेलिस कोठडी द्यावी अशी विनंती न्यायाधिशांना केली. यावर न्यायालयाने (court) पोलीस (police) तपासावरच ताशेरे ओढत दहा दिवसांमध्ये काय चौकशी केली याची विचारणा केली. त्यावेळेस पोलीस कोठडी वाढवून याबाबत पोलिसांकडे कोणतेही ठोस पुरावे नव्हते.

Court
Nitesh Rane: वकीलांचा युक्तिवाद पुर्ण; नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात पाेलिस बंदाेबस्तात वाढ

विशेष म्हणजे संतोष राठोड यांच्या वकिलाला न्यायालयामध्ये एकही शब्द बोलण्याचे काम पडले नाही. त्यानंतर न्यायाधीश ए कुलकर्णी यांनी संशयित आरोपीला न्यायालयीन कोठडी देत हर्सूल कारागृहात (harsul jail) रवानगी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Court
Satara : सातारा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 17 लाखाचा गुटखा केला जप्त
Court
Australian Open 2022: राफेल नदाल द किंग ऑफ टेनिस

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com