Beed: भाजप आमदार सुरेश धस यांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका; धसांसह 38 जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल

MLA Suresh Dhas Latest News: आठ महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यात कलम वाढवण्याच्या आदेशाने धसांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आमदार धसांसह 38 जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टानं दिले आहे.
A case of robbery has been registered against 38 persons including Suresh Dhas
A case of robbery has been registered against 38 persons including Suresh DhasSaam Tv

बीड: भाजपचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुरेश धस यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने चांगलाच दणका दिलाय. आमदार धस (Suresh Dhas) यांच्यासह 38 जणांवर दरोड्याचा (Robbery) गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आठ महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यात 395 कलम वाढवण्याच्या आदेशाने धसांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आष्टी तालुक्यातील मनोज चौधरी यांच्या पत्नी, माधुरी चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, आठ महिन्यांपूर्वी आमदार सुरेश धस यांच्यासह 38 जणांवर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. (Aurangabad bench slams BJP MLA Suresh Dhas; A case of robbery has been registered against 38 persons including Suresh Dhas)

हे देखील पहा -

माधुरी चौधरी यांच्या फिर्यादीवरून आमदार सुरेश धस यांनी आठ महिन्यांपूर्वी आपल्या कार्यकर्त्यांसह राजकीय सूडबुद्धीने आपल्या घरांची संरक्षक भिंत पाडली आणि संरक्षक भिंतीचे साहित्य गॅस कटरने कापून घेऊन गेले, अशी फिर्याद दिली होती. यावरून पोलिसांनी कलम 143 , 147 , 148 , 149 , 427 , 336 आणि 379 ही कलमे लावली होती. मात्र त्यांनतर फिर्यादी चौधरी यांनी कलमात वाढ करण्यात यावी. ही मागणी घेऊन औरंगाबाद खंडपीठात रिट दाखल केली होती. त्यांनतर कलमात वाढ करण्याचे आदेश, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत.

A case of robbery has been registered against 38 persons including Suresh Dhas
जळगाव ते मुंबई विमान सेवा रद्द

माधुरी चौधरी यांच्या रिट याचिकेमुळे कलमात बदल होऊन, दरोडा 395, बेकायदा घरात घुसने 448, चुकीच्या पद्धतीने एखाद्याला रोखून भीती दाखवणे 453, यासह शांतता भंग करणे आणि इतर 341, 504, 506 ही कलमे लावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले. दरम्यान यामुळे आता भाजप आमदार सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com