Ahmednagar: पोलिसांनी तरुणांना बेदम मारहाण केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल....

मंत्री शंकरराव गडाखांच्या सोनईत चाललंय तरी काय हाच प्रश्न निर्माण होत आहे.
Audio Clip
Audio ClipSaam TV
Published On

अहमदनगर - सोनई येथे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाखा यांना जीवे मारण्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झालीची घटना ताची असताना सोनईतील पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्याच्या संभाषणाची दुसरी ऑडिओ क्लीप सोशलमिडीयावर तुफान व्हायरल झाली आहे.'खाकी'वर्दीच्या नावाखाली तरुणांना पोलीस स्टेशनला बोलावून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे मंत्री शंकरराव गडाखांच्या सोनईत चाललंय तरी काय हाच प्रश्न निर्माण होत आहे.

काही दिवसांपूर्वी मंत्री गडाखांच्या स्वीय सहाय्यकावर गोळीबार आणि त्यानंतर गडाख पितापुत्रास धमकी दिल्याची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. हे प्रकरण ताजे असून दोन आरोपी अजूनही पोलिसांना सापडत नाही तरआता 'खाकीचा धाक' दाखवून विनाकारण युवकास बेदम मारहाण करण्याचा कट रचून उघड करणारी ऑडिओ क्लीप सोशलमिडीयावर व्हायरल झाली आहे.या कटकारस्थान विषयी परीसरात संताप व्यक्त होत आहे.

हे देखील पाहा -

व्हायरल झालेल्या क्लीपमध्ये साहेबांच्या जवळ राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने दुय्यम अधिकाऱ्यास देव्हारे, राज्या आणि महेशला आणून ठोकून काढा असे सांगितले आहे.मला येवूपर्यत सोडू नका मलापण हात धुवायचा आहे.असे सांगून याबाबत मोरेला कळू देवू नका असे सांगितले. जनतेचा मित्र म्हणून ओळख असलेल्या पोलिसांचा बुरखा या क्लीपमुळे फाटला आहे.

तेरा दिवसापुर्वी कुठलाही गुन्हा अथवा चुकी नसताना गणेशवाडी येथील राजेंद्र मोहीते व सोनई येथील तुषार देव्हारे यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली होती. मर्जी राखण्यासाठी कुणाच्या तरी सांगण्यावरून हा प्रकार झाल्याचा आरोप करुन पोलीस ठाण्यावर मोर्चाही काढण्यात आला होता.

Audio Clip
बदलापुरातील तरुणाच्या हत्येचा उलगडा; आंध्र प्रदेशात पळून गेलेल्या आरोपीला ठोकल्या बेड्या

सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागुल,फौजदार उमेश पतंगे व संजय चव्हाण व अन्य एका कर्मचा-यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र अजूनही दोषींवर कोणती कारवाई केली नाही. मोहिते या तरुणाला बेदम मारहाण केल्याने त्याला लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. दोन दिवसापूर्वी उपचार घेऊन मोहिते घरी आला आहे. तरी संबधीत मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कोणतीच कारवाई झाली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com