शिवसेना कार्यालयावरील हल्ला, हा मला जीवे मारण्याचा कट; महानगर प्रमुखांचा आरोप

काल अमरावतीमधील राजापेठ येथील शिवसेना महानगर प्रमूख पराग गुडधे यांच्या कार्यालयावर राणा समर्थकांनी हल्ला केला.
Shivsena Vs Rana
Shivsena Vs RanaSaam TV
Published On

अमर घटारे -

अमरावती : मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करणारच असा इशारा देत अमरावतीमधून मुंबईमध्ये आलेल्या राणा दाम्पत्यांने मुख्यमंत्र्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या या इशाऱ्यामुळे मुंबईमधील शिवसैनिक (Shivsainik) आक्रमक झाले होते. हे प्रकरण मिटत नाही तोपर्यंत आता अमरावतीत राणा विरुद्ध शिवसेना (Rana vs Sena) वाद सुरु झाला आहे. काल अमरावतीमधील राजापेठ येथील शिवसेना महानगर प्रमूख पराग गुडधे (Parag Gudadhe) यांच्या कार्यालयावर आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करत खुर्च्याची फेकाफेक केली. तसंच शिवसेना कार्यालयाबाहेर फटाके फोडले होते या प्रकरणी राणा यांच्या ४ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, शिवसेना कार्यालयात कुणी नसताना राणा समर्थक घुसले आणि त्यांनी खुर्च्यांची तोडफोड केली. पेट्रोलच्या बाटल्यासुद्धा त्यांनी सोबत आणल्या होत्या. त्यांच्याकडून मला जीवानिशी मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यामुळे मला हा हल्ला म्हणजे मला मारण्याचाच डाव होता असा आरोप शिवसेना महानगर प्रमुख पराग गुडधे यांनी केला. त्यामुळे मुंबईनंतर राणा आणि सेना हा वाद अमरावतीत (Amaravati) पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राणा यांच्या घराची पाहणी

Shivsena Vs Rana
भाजपाने एका व्यंगचित्रकाराचा गळा घोटला; संजय राऊतांचे टीकास्त्र

दरम्यान, राणा दाम्पत्याला आता जामीन मिळाला असला तरी त्यांच्या अडचणींमध्ये कमी झालेली नाही कारण आज राणा यांच्या खारमधील घरामध्ये मुंबई पालिकेचे कर्मचारी बेकायदेशिर बांधकामाची पाहणी करण्यासाठी गेले आहेत. मूळ आराखड्यात बदल करत या इमारतीच्या आतील बांधकाम केल्याची तक्रार पालिकेकडे दाखल झाली होती. त्यानुसार पालिका अधिकारी त्यांच्या घराची राहणी करण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे एकीकडे मुंबईत राणा दाम्पत्यांची अडचण शिवसैनिक करत आहेत तर अमरावतीत राणा यांचे कार्यकर्ते शिवसेना कार्यकर्त्यांवरती हल्ला करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com