Jalna: जळालेला ट्रान्सफॉर्मर बदलून देण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना सहाय्यक अभियंत्याला अटक

Jalna: रिपोर्टवर सही करण्यासाठी यातील तक्रारदार यांच्याकडे खाजगी एजंटमार्फत अभियंता जैसवाल यांनी सहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
Burnt Transformer, Jalna
Burnt Transformer, Jalnaलक्ष्मण सोळुंके
Published On

जालना: शेतातील जळालेला विद्युत ट्रान्सफॉर्मर (Electrical Transformer) बदलून देण्यासाठी पाच हजारांची लाच (Bribe) घेताना महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला (Assistant Engineer) रंगेहात अटक झाल्याची घटना मंठा तालुक्यातल्या वाटुर फाटा येथे घडली आहे. संदीप लक्ष्मणलाल जैसवाल (सहाय्यक अभियंता महावितरण, वाटूर) असं अटक करण्यात आलेल्या अभियंत्यांचे नाव आहे. तक्रारदार शेतकऱ्याच्या शेतातील विद्युत ट्रान्सफॉर्मर गेल्या काही दिवसांपूर्वी जळाला होता. तो बदलून देण्यासाठी रिपोर्टवर सही करण्यासाठी यातील तक्रारदार यांच्याकडे खाजगी एजंटमार्फत अभियंता जैसवाल यांनी सहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. (Assistant engineer arrested for taking Rs 5,000 bribe for replacement of burnt transformer in jalna)

हे देखील पहा -

Burnt Transformer, Jalna
Nandurbar: सूरतहुन पुरीकडे जाणाऱ्या रेल्वे AC बोगीला आग ! (पहा Video)

तडजोडी अंती पाच हजार रुपये स्विकारण्याचे मान्य करून ऍडव्हान्स म्हणून दोन हजार घेतले, आणि तीन हजार रुपयांची लाच स्वतः संदीप लक्ष्मण लाल जैसवाल याने स्वीकारले असता पंचासमक्ष लाच लुचपत विभागाच्या अधिकारांनी त्याला रंगेहात पकडून त्याला अटक (Arrest) करून त्यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंध कायद्या (Bribery Prevention Act) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com